शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:40 IST

१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता.

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयपूरच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवर आझमी, सैफुर्रहमान आणि शाहबाज अहमद यांना दोषी ठरवले होते. यानंतर त्यांना मंगळवारी (८ एप्रिल) ही शिक्षा सुनावण्यात आली.

झाला होता ७१ जणांचा मृत्यू -१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता.

१७ वर्षांनंतर मिळाला न्याय - जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधधित प्रकरणांत चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर, राजस्थान उच्च न्यायालयाने मार्च २०२३ मध्ये सर्वांना निर्दोष सोडले होते. १७ वर्षे जुन्या या प्रकरणात, सरकारी वकिलांनी ११२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तर सुमारे १२०० कागदपत्रे न्यायालयात सादर केली. यानंतर न्यायालयाने मंगळवारी (८ एप्रिल) ६०० पानांचा निकाल दिला.

तीन आरोपी अद्यापही फरार -या प्रकरणात पोलिसांनी एकूण १३ झणांना आरोपी केले होते. यांतील तीन जण अद्यापही फरार आहेत. तर दोन जण हैदराबाद आणि दिल्लीतील कारागृहात आहेत. तर दोन जण दिल्लीतील बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये मारले गेले होते.सायंकाळच्या सुमारास झाले होते स्फोट - चांदपोलमध्ये सापडलेल्या नवव्या जिवंत बॉम्बच्या प्रकरणात न्यायालयात स्वतंत्र सुनावणी झाली. गेल्या ४ एप्रिल २०२५ रोजी जयपूरच्या विशेष न्यायालयाने चार आरोपींना दोषी ठरवले होते. १३ मे २००८ रोजी राजधानी जयपूरमधील गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी ७.३० वाजता आठ स्फोट झाले. या स्फोटात १८५ हून अधिक लोक जखमी झाले होते. जोहरी बाजार, सांगानेरी गेट, चांदपोल बाजार आणि त्रिपोलिया बाजार अशा वर्दळीच्या ठिकाणी हे स्फोट झाले होते. 

टॅग्स :terroristदहशतवादीCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेपRajasthanराजस्थान