शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कपाटातून निघाल्या २००० रुपयाच्या ७,२९८ नोटा; एक किलो सोन्याची वीट; काळा पैसा कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 13:03 IST

फायली बाहेर काढण्यासाठी बंद अलमिरा उघडण्यात आली आणि त्यातून काळा पैसा जप्त करण्यात आला.

राजस्थानची राजधानी जयपूरमधील सचिवालयापासून काही पावलांच्या अंतरावर २.३१ कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कालच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी माहिती आणि तंत्रज्ञान विभाग (DOIT) कार्यालयात ठेवलेल्या कपाटातून ही रक्कम जप्त करण्यात आली. योजना भवन. कपाटात सापडलेल्या या रकमेत २००० च्या ७,२९८ नोटा म्हणजेच एक कोटी ४५ ​​लाख ९६ हजार रुपयांचा समावेश आहे. याशिवाय ५०० च्या १७ हजार १०७ नोटा सापडल्या ज्यांची किंमत ८५ लाख ५३ हजार ५०० रुपये आहे. यासोबतच एक किलो वजनाची सोन्याची विटही सापडली आहे. त्यावर 'मेड इन स्वित्झर्लंड' असे लिहिले. बाजारभावानुसार सोन्याची किंमत सुमारे ६२ लाख रुपये आहे.

या विभागात कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी विभागाच्या कार्यालयात ठेवलेल्या कपाटाची चावी सापडली नाही. हे पाहून डीओआयटीच्या अधिकाऱ्यांनी कुलूप तोडले. उघडल्यावर त्यांना फायलींव्यतिरिक्त कपाटात एक संशयास्पद बॅग ठेवलेली दिसली. डीओआयटीच्या अतिरिक्त संचालकांनी पोलिसांना ही माहिती दिली. 

पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.  बॅग उघडली असता त्यामधून २.३१ कोटी रुपये रोख आणि एक किलो वजनाच्या सोन्याची वीट सापडली. आता या प्रकरणी जयपूर शहर पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना ताब्यात घेतले असून हा काळा पैसा कोणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, काळा पैसा विभागातील सरकारी अधिकाऱ्यांचा आहे. त्यांनी कपाटात पैसे लपवून ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी ज्या कंत्राटदारांना निविदा वाटण्यात आल्या होत्या त्यांच्यामार्फत ही रक्कम घेण्यात आली होती. मात्र, नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

टॅग्स :Policeपोलिस