शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 19:29 IST

बेसमेंटच्या खोदकामावेळी भिंतींना भेगा पडल्या, ज्यामुळे इमारत एका बाजूला झुकली.

जयपूरच्या मालवीय नगर सेक्टर ९ मध्ये बांधकाम सुरू असलेलं ५ मजली हॉटेल झुकू लागलं, मात्र योग्य वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. बेसमेंटच्या खोदकामावेळी भिंतींना भेगा पडल्या, ज्यामुळे इमारत एका बाजूला झुकली. याच दरम्यान जयपूर विकास प्राधिकरण (जेडीए) आणि प्रशासनाने ती योग्य पद्धतीने पाडण्याचा मोठा निर्णय घेतला. अवघ्या ५ सेकंदात संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली.

भेगा पडताच आणि हॉटेल झुकू लागताच सर्व कामगार त्यांचं काम सोडून सुरक्षित ठिकाणी पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलीस आणि प्रशासनाला माहिती दिली. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. पाडण्याच्या तयारीसाठी दोन क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु वाढत्या धोक्यामुळे, जेडीएने संपूर्ण इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. जेसीबी मशीनमुळे इमारतीखालील रचना कमकुवत झाली आणि काही क्षणातच हॉटेल कोसळलं.

हॉटेल मालक घटनास्थळी पोहोचला आणि जेडीएच्या कारवाईचा निषेध केला. त्यांनी दावा केला की त्यांनी महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे आणि १.२५ लाख जमा केले आहेत. तरीही हॉटेल बेकायदेशीर घोषित करण्यात आलं आणि ते पाडण्यात आलं. जेडीए झोन १ तहसीलदार शिवांग शर्मा यांनी सांगितलं की, हे हॉटेल निवासी क्षेत्रात बांधलं जात होतं, ज्यामध्ये व्यावसायिक गोष्टींसाठी नियमांचं उल्लंघन केलं जात होतं. शिवाय बेसमेंटचं खोदकाम केलं जात होतं आणि कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

९० यार्डच्या जागेवर हॉटेल वेगाने बांधलं जात होतं. अवघ्या सात महिन्यांत संपूर्ण पाच मजली इमारत पूर्ण झाली आणि काम जवळजवळ पूर्ण झालं. मात्र बेसमेंटच्या भिंतीला भेगांमुळे इमारतीला धोका निर्माण झाला. प्रशासनाने इमारतीचं पाडकाम केल्याने मोठी दुर्घटना टळली. या कारवाईनंतर रहिवासी आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

English
हिंदी सारांश
Web Title : Jaipur: Five-story hotel collapses like cards in seconds after basement work.

Web Summary : A five-story Jaipur hotel, weakened by unauthorized basement excavation, tilted dangerously. Authorities swiftly demolished it, averting a major disaster. The owner protested, claiming permits, but officials cited construction violations in a residential zone. Residents breathed a sigh of relief.
टॅग्स :Rajasthanराजस्थानBuilding Collapseइमारत दुर्घटना