जयमल्हार कृषी प्रदर्शन.... जोड

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30

जोड.....

Jaimalhar Agriculture Exhibition ... | जयमल्हार कृषी प्रदर्शन.... जोड

जयमल्हार कृषी प्रदर्शन.... जोड

ड.....
व सोसायटीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे यांचा काय संबंध? हे प्रदर्शनच मुळी जिल्हा परिषदेचे नव्हते. तो एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा खासगी इव्हेंट असल्याचीच चर्चा प्रदर्शनस्थळी होती. याच पदाधिकार्‍यांनी प्रदर्शनासाठी पुणे जिल्हा बँकेकडून दोन लाखांचा निधी घेतला होता. तशाच प्रकारे इतर ही अनेक संस्थांनी लाखो रुपयांची मदत या प्रदर्शनाला केली होती. प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी व स्टॉल भाडे या सर्व रकमांचा हिशेब या अहवालात का नाही? हा प्रकार पुणे जिल्हा परिषदेच्या याच समितीच्या सभापती सारिका इंगळे यांना समजत नव्हता का? यावेळी त्यांचे पिताश्री आदर्श जिल्हा परिषद माजी सदस्य व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे यांनी योग्य ते मार्गदर्शन का केले नाही? पुरंदर पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर यांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष का केले? आदी मुद्दे उपस्थित करीत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषदेकडून प्रदर्शनासाठी देण्यात आलेले १३ लाख आणि प्रदर्शनासाठी विविध संस्था संघटनांकडून घेण्यात आलेला लाखो रुपयांचा मदत निधी, प्रदर्शनातून निर्माण झालेले उत्पन्न हे काही कोटी रुपयांच्या घरात जात असून या प्रदर्शनाची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी पुरंदरच्या राजकीय क्षेत्रातून होत असल्यानेच सध्या सुरू असलेली पुरंदर खरेदी-विक्री संघाची निवडणूक व पुढील महिन्यातील ग्रामपंचायतीची, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे चांगल्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Web Title: Jaimalhar Agriculture Exhibition ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.