शेतकर्‍यांच्या प्रश्नावर १५ सप्टेंबरला जेलभरो; राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

By Admin | Updated: September 8, 2015 15:42 IST2015-09-08T15:42:27+5:302015-09-08T15:42:27+5:30

विरोधात असल्याचे भान ठेवा- भुजबळांच्या पदाधिकार्‍यांना कानपिचक्या

Jail Bharo on September 15; Decision in NCP meeting | शेतकर्‍यांच्या प्रश्नावर १५ सप्टेंबरला जेलभरो; राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर १५ सप्टेंबरला जेलभरो; राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

रोधात असल्याचे भान ठेवा- भुजबळांच्या पदाधिकार्‍यांना कानपिचक्या
नाशिक : मराठवाड्यातील तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शेतकर्‍यांसह जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही दुष्काळाची तीव्रता वाढली असून, सरकारला याबाबत उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी १५सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी जेलभरो आंदोलन करणार आहेत.
येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.८) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्व तालुकाध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी राज्यातील दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली. मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार विरोधात येत्या १४ सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे, जळगाव, नंदुरबारच नव्हे तर नाशिक व अहमदनगर जिल्‘ांतही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. नाशिकला येत्या १५ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येईल. यावेळी जिल्‘ातील सर्वच तालुकाध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरू, अशी ग्वाही दिली. यावेळी बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, माजी खासदार देवीदास पिंगळे, शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, सचिन पिंगळे, छबू नागरे, रायुकॉँ शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर, रंजन ठाकरे, छबू नागरे, विनायक खैरे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, अलका जाधव, सुनील वाजे, संजय सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
इन्फो..
विरोधात असल्याचे भान ठेवा
बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना कानपिचक्या देताना आपण आता विरोधात आहोत, याचे भान ठेवा. काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही अजूनही सत्तेत असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी जनसामान्यांच्या व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने केली पाहिजेत, असे कुंभमेळ्याचे व दुष्काळाचे उदाहरण देऊन भुजबळांनी उपस्थितांचे कान टोचले.

Web Title: Jail Bharo on September 15; Decision in NCP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.