शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम! बंगालमध्ये ममता आणि भाजपाच्या लढाईत पोस्ट खात्याचं वाढलं काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 11:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. ममता बॅनर्जींसमोर जय श्रीराम म्हटल्याने काही जणांवर कारवाई केली गेल्याच्या निषेधार्थ भाजपाने ममता बॅनर्जींना जय श्रीराम असा उल्लेख असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर तृणमूल काँग्रेसकडून जय हिंद जय बांगला या घोषवाक्याद्वारे जय श्रीरामला प्रत्युत्तर दिले जात आहे.पण दोन्ही पक्षांमध्ये पत्रांद्वारे सुरू असलेल्या शीतयुद्धात पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांची मात्र पळापळ होत आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात जय श्रीराम हा नारा देण्यास सुरुवात केली होती. अगदी समोरासमोर या घोषणा दिल्या गेल्याने ममता बॅनर्जी यांचा तीळपापड झाल्याचेही अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान, सध्या ममता बॅनर्जींच्या पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पत्रे पाठवण्यात येत असल्याने ममता बॅनर्जींचे निवासस्थान असलेल्या दक्षिण कोलकात्यामधील कालीघाट पोस्ट ऑफीसमध्ये दररोज हजारो पत्रांचा ढीग जमत आहे. पोस्ट खात्यामधील कर्मचाऱ्यांसाठी पोस्टकार्ड हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे प्रत्येक पत्राला कर्मचाऱ्यांकडून सुनियोजित पद्धतीने हाताळले जाते. दरम्यान, पोस्ट ऑफीसमधील सूत्रांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांना सरासरी 30 ते 40 पत्रे आणि रजिस्टर पत्रे येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांना येणाऱ्या पत्रांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या ममता बॅनर्जींना येणाऱ्या पत्रांची संख्या ही या पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या एकूण पत्रसंख्येपैकी दहा टक्के आहे.  दरम्यान, ममता बॅनर्जींच्या नावे येणारी पत्रे त्यांच्या निवासस्थानी पोच करण्यासाठी खास एका पोस्टमनची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पोस्टमन ही पत्रे घेऊन रोज ममतांच्या निवासस्थानी येतो आणि संबंधित व्यक्तिकडे देऊन निघून जातो, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, रेल्वे मेल सर्व्हिसनेसुद्धा ममता बॅनर्जींसाठी आलेली सुमारे 4 हजार 500 पत्रे वेगळी केली आहेत. तसेच या प्रकारामुळे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जीं संतप्त झाल्या असून, त्यांच्याकडूनही पोस्ट कार्डला पोस्ट कार्डने प्रत्युत्तर देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. जय श्रीराम ऐवजी जय हिंद, जय बांगला असे उल्लेख असलेली पोस्टकार्ड तृणमूलकडून नरेंद्र मोदींना पाठवण्यातच येत आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण