शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'जय श्रीराम' चा बंगाली संस्कृतीशी काहीही संबंध नाही - अमर्त्य सेन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 11:20 IST

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम हा वादाचा मुद्दा बनला असून, या वादात आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजककीय वातावरण कमालीचे तापले होते. त्यातच बंगालमध्ये मुसंडी मारण्याच्या इराद्याने उतरलेल्या भाजपाने जय श्रीराम हा नारा देत बंगालमधील सत्ताधार असलेल्या तृणमूल काँग्रेसला जेरीस आणले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम हा वादाचा मुद्दा बनला असून, या वादात आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे. जय श्रीराम या घोषणेचा बंगाली संस्कृतीशी काहीही  संबंध नाही. या घोषणेचा वापर केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी होत आहे, असा आरोप अमर्त्य सेन यांनी केला आहे. शुक्रवारी जादवपूर विद्यापीठामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अमर्त्य सेन यांनी जय श्रीराम या घोषणेवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. ''आता कोलकात्यामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतो. पूर्वी तो होत नसे. सध्या जय श्रीराम ही घोषणा लोकांना मारहाण करण्यासाठी उपयोगात आणली जात आहे.'' दरम्यान, जय श्रीराम या घोषणेचा वापर भाजपाकडून सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपाकडून जय श्रीराम या घोषणेचा प्रभावी वापर करण्यात आला होता. तसेच काही ठिकाणी जय श्रीराम अशी घोषणा देणाऱ्यांविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली होती.  अमर्त्य सेन यांनी पुढे सांगितले की, ''एकदा मी माझ्या चार वर्षीय नातीला विचारले की, तुझी आवडती देवी कोण आहे. त्यावर तिने दुर्गा माता असे उत्तर दिले. बंगालमध्ये दुर्गा मातेला जे महत्त्व आहे त्याची तुलना रामनवमीशी होऊ शकत नाही. दुर्गामाता आमच्या जीवनात उपस्थित आहे. तर जय श्रीराम सारख्या घोषणा केवळ लोकांवर हल्ला करण्यासाठी आडोसा म्हणून दिल्या जातात असे मला वाटते.''  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणBJPभाजपाtmcठाणे महापालिका