जय मार्कंडेय़़़ जय जय मार्कंडेय डॉल्बीचा दणदणाट : पावसाच्या सरी झेलत पार पडला रथोत्सव, तरुणाईच्या उत्साहाला उधाण
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
सोलापूर : उंट, घोडे.. महर्षींची पालखी.. मागोमाग लक्ष वेधून घेणारा रथ.. तरुणाईचा कलाविष्कार.. मधूनच पावसाच्या सरी झेलत ‘जय मार्कंडेय.. जय जय मार्कंडेय’च्या जयजयकारात निघालेल्या रथोत्सवाने पूर्व भागातील भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटल़े

जय मार्कंडेय़़़ जय जय मार्कंडेय डॉल्बीचा दणदणाट : पावसाच्या सरी झेलत पार पडला रथोत्सव, तरुणाईच्या उत्साहाला उधाण
स लापूर : उंट, घोडे.. महर्षींची पालखी.. मागोमाग लक्ष वेधून घेणारा रथ.. तरुणाईचा कलाविष्कार.. मधूनच पावसाच्या सरी झेलत ‘जय मार्कंडेय.. जय जय मार्कंडेय’च्या जयजयकारात निघालेल्या रथोत्सवाने पूर्व भागातील भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटल़े शनिवारी सकाळी 10़30 वाजता सिद्धेश्वर पेठेतील मंदिरातून वाजतगाजत रथोत्सव निघाला़ प्रारंभी व्यंकटेश सिंदम यांच्या हस्ते भगवान मार्कंडेय यांच्या मूर्तीला महारुद्राभिषेक करण्यात आला़ त्यानंतर लक्ष्मीनारायण कमटम यांच्या हस्ते होमहवन करण्यात आल़े संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य पुरोहित संघमचे अध्यक्ष रामलू र्शीराम पंतलू यांनी केल़े मिरवणुकीपूर्वी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, उपाध्यक्ष बालराज बोल्ली, सरचिटणीस सुरेश फलमारी, सहचिटणीस संतोष सोमा, पुरुषोत्तम उडता, सत्यनारायण बोल्ली, अंबाजी गुर्रम, जनार्दन कारमपुरी, विजय नक्का, अँड़ रामदास सब्बन, हरिबाबू येले, प्रा़ वसंत सोमा, रामचंद्र जन्नू, पेंटप्पा गड्डम, दशरथ गोप, पांडुरंग दिड्डी, हरिदास पोटाबत्ती, र्शीनिवास क्यातम, अशोक यनगंटी यांची प्रमुख उपस्थिती होती़ याशिवाय मिरवणुकीवेळी नगरसेविका कुमुद अंकाराम, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, विठ्ठल कोटा, अंबादास बिंगी, नागनाथ मादगुंडी, अशोक इंदापुरे, सत्यनारायण गुर्रम, रायमल्लू कमटम, सिद्राम जिंदम, शशिकांत कैंची, किसन र्शीराम, रायेशम कुरापाटी, डॉ़ राजेंद्र गाजूल, र्शीनिवास दिड्डी, प्रभाकर चिप्पा, महांकाळी येलदी, नागबाबू कुडक्याल, नागेश पासकंटी, नागनाथ गज्जम, गणेश गड्डम, दत्तात्रय यन्नम, र्शीनिवास मॅकल, सुदर्शन शहा यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होत़े (प्रतिनिधी)मंदिरातील सजावटीला लागले 24 तासरथोत्सवाच्या आदल्या दिवशी दरवर्षी मंदिर फुलांनी सजवण्याची परंपरा आह़े हजारो किलो फुले सजावटीसाठी लागतात़ शुक्रवारी दिवस-रात्र एक करून मंदिरात फुलांचा साज करण्यात आला़ दहा कारागिरांनी मंदिर सुशोभीकरणाचे काम पार पाडल़े फुलांची सजावट आणि त्याच्या सुगंधाने भक्तांचे मन प्रसन्न करवून सोडल़े पावसाने लावली हजेरीदुपारी 3़45 वाजता मिरवणूक बालाजी मंदिर परिसरात आली आणि इतक्यात पावसाने हजेरी लावली़ पावसाच्या सरी अंगावर घेत तरुणाईने आपला कलाविष्कार सादर केला़ या पावसातच ढोल-ताशांचा दणदणाट, डॉल्बी सुरू राहिला़ उलट पावसाने वातावरणात उत्साहाचा रंगच भरला़ 35 संघटना, मंडळांचा सहभागया रथोत्सवात यंदाही जवळपास 35 संघटना, मंडळांचा सहभाग होता़ यामध्ये नृत्य सादर करणारे मंडळ सर्वाधिक सहभागी झाले होत़े ओम साई प्रतिष्ठान, दत्तात्रय लेझीम संघ, ओंकार डान्स ग्रुप, स्वामी विवेकानंद शक्ती प्रयोग मंडळ, पद्मवंशीय मार्कंडेय प्रतिष्ठान, टीआरजी डान्स ग्रुप, न्यू डी डान्स ग्रुप, विश्व प्रतिष्ठान, आंध्रदत्त लेझीम संघ, आरकाल मित्र परिवार, मार्कंडेयराज प्रतिष्ठान, ज़े डी़ मित्रमंडळ डान्स, शिवमार्कंडेय प्रतिष्ठान नवीपेठ, संस्कृती मंडळ अशा अनेक मंडळांनी सहभाग नोंदवत आपला कलाविष्कार दाखविला़