शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

UP Police on Alert: जहांगीरपुरी हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश अलर्ट मोडवर, पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 09:06 IST

UP Police on Alert: हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मोठा हिंसाचार झाला. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: काल(16 एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार (Delhi Jahangirpuri Violence) झाल्याची घटना घडली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केली. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, त्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशपोलिसांनी शनिवारी राज्यव्यापी अलर्ट जारी केला. 

पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचनायूपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) प्रशांत कुमार म्हणाले की, दिल्लीतील जहांगीरपुरी घटनेनंतर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील संवेदनशील भागांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अधिका-यांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीत नेमकं काय झालं?हनुमान जन्मोत्सवानिमित्त दिल्लीतील जहांगीरपुरी भागात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. यानंतर दोन समुदायांमध्ये मोठा हिंसाचार उसळला. यामध्ये पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. जखमींना जहांगीरपुरी येथून बाबू जगजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरलया घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक दगडफेक आणि जाळपोळ करताना दिसत आहेत. जाळपोळ आणि दगडफेकीच्या वेळी हेल्मेट घातलेले पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले. काही व्हिडिओंमध्ये तरूण दगडफेक करतानाही दिसत आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi violenceदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस