भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान कोसळलं

By Admin | Updated: October 3, 2016 19:55 IST2016-10-03T19:46:54+5:302016-10-03T19:55:29+5:30

भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान सरावादरम्यान राजस्थानमधल्या पोखरणमध्ये कोसळलं आहे.

Jaguar aircraft of Indian Air Force collapses | भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान कोसळलं

भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान कोसळलं

ऑनलाइन लोकमत

जयपूर, दि. 3 - भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान सरावादरम्यान राजस्थानमधल्या पोखरणमध्ये कोसळलं आहे. मात्र विमानातील दोन्ही पायलट्स सुरक्षित आहेत. भारतीय हवाई दलाच्या या जग्वार विमानाचा नेहमीप्रमाणे सराव सुरू होता. त्याचवेळी इंडो-पाक सीमेजवळच्या भागात हे विमान कोसळलं आहे, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते मनीष ओझा यांनी दिली आहे. कोर्टानं या विमान दुर्घनटेच्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Web Title: Jaguar aircraft of Indian Air Force collapses