शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Jagdeep Dhankhar Jaya Bachchan: "बास झालं, तुम्ही सेलिब्रिटी असाल पण..."; जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांची काढली खरडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 13:27 IST

Jagdeep Dhankhar Jaya Bachchan, Monsoon Session: आजच्या सत्रात जगदीप धनखड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी जया बच्चन यांना अतिशय कठोर शब्दांत सुनावलं

Jagdeep Dhankhar Jaya Bachchan: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि खासदार जया बच्चन यांच्यात शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळत आहे. धनखड यांनी जया बच्चन यांचे नाव घेताना जया अमिताभ बच्चन असे घेतल्यानंतर हा वाद सुरु झाला होता. माझी स्वत:ची ओळख असताना माझ्या पतीचे नाव घेतले जाऊ नये, असे मत जया बच्चन यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात धनखड आणि जया बच्चन यांच्यात थोड्या प्रमाणात शाब्दिक चकमकी पाहायला मिळत होत्या. त्यातील पुढचा अंक आज पाहायला मिळाला. आजच्या सत्रात जगदीप धनखड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी जया बच्चन यांना अतिशय कठोर शब्दांत सुनावलं.

नक्की काय घडला प्रकार?

आजच्या राज्यसभेच्या कार्यवाहीदरम्यान जया बच्चन बोलण्यासाठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी धनखड यांच्यावर एक आरोप केला. "मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे, मला इतरांची देहबोली (बॉडी लँग्वेज) आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. पण मला माफ करा सर, पण तुमचा बोलण्याचा टोन हा स्वीकारार्ह नाही. आपण सहकारी आहोत," असे जया बच्चन म्हणाल्या.

जगदीप धनखड यांनी काढली खरडपट्टी

"जया जी, तुम्ही खूप नाव कमावलं आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते. तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय. मी येथे पाहून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय... आता बास झालं... तुम्ही भले सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही."

"अशा गोष्टींचे सवय करुन घेऊ नका. रोज येथे अशा भावनेतून येऊ नका की तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि तुम्हालाच मान सन्मान आहे. येथे प्रत्येक सदस्याचा आदर केला जातो. त्यामुळे जो आदर-सत्कार तुम्ही कमावला आहात, त्याच्या लौकिकाल साजेशी वर्तणूक असू द्या. असले प्रकार या सदनात खपवून घेतले जाणार नाहीत," असेही जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांना सुनावले.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनJaya Bachchanजया बच्चनRajya Sabhaराज्यसभाCelebrityसेलिब्रिटी