शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:07 IST

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला असून, तो संविधानाच्या अनुच्छेद ६७ (अ) नुसार देण्यात आला आहे. धनखड यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता.धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे की, "माझ्या कार्यकाळात राष्ट्रपतींबरोबर सौहार्दपूर्ण आणि शांत वातावरणात काम करता आले, याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे सहकार्यही मला सतत लाभले. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. खासदारांकडून मिळालेला विश्वास, प्रेम आणि आधार मी कायम स्मरणात ठेवेन," असेही उपराष्ट्रपतींनी राजीनाम्यात म्हटले आहे.संसदेचे अधिवेशन सुरू असताना राजीनामा देणारे धनखड हे पहिले उपराष्ट्रपती आहेत. धनखड यांनी २०२२ मध्ये १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती निवडणुकीत धनखड यांनी ७२५ पैकी ५२८ मते घेत विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. अल्वा यांना १८२ मते होती.    

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारत