शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

JP Nadda: जगतप्रकाश नड्डा पुन्हा भाजपच्या अध्यक्षपदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:40 IST

JP Nadda: भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी फेरनिवड होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने भाजप नेतृत्वाने विचार सुरू केला आहे. अमित शहा यांना २०१९ साली केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर नड्डा यांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी फेरनिवड होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने भाजप नेतृत्वाने विचार सुरू केला आहे. अमित शहा यांना २०१९ साली केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर नड्डा यांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्यांची या पदावर तीन वर्षांसाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जानेवारी २०२० मध्ये औपचारिकरीत्या निवड केली होती. भाजपचे अध्यक्ष म्हणून जगतप्रकाश नड्डा यांनी आजवर बजावलेल्या कामगिरीने त्या पक्षातील तसेच संघपरिवारातील नेते समाधानी आहेत. नड्डा यांच्या हाती भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा ठेवून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी, असा त्या पक्षाच्या नेत्यांचा विचार आहे.भाजपचे अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीआधी सर्व राज्यांमध्ये भाजपने संघटनात्मक बदल केले आहेत. उत्तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी भूपेंद्र चौधरी यांची निवड करण्यात आली. सुनील बन्सल हे आता भाजपचे पश्चिम  बंगाल, तेलंगणा, ओडिशा या राज्यांचे प्रभारी बनले आहेत. 

बिहार भाजपमध्येही बदलांची शक्यताबिहारमध्ये नितीशकुमार यांनी राजदशी आघाडी करून नवे सरकार स्थापन केल्यानंतर त्या राज्यात भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये असे बदल गुजरात, हिमाचल प्रदेशमध्येही दिसू शकतील. गेल्या काही काळात भाजपने महाराष्ट्रासह काही राज्यांत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली. बी. एस. येडीयुरप्पा यांना भाजपच्या संसदीय मंडळामध्ये घेतल्याने कर्नाटकमधील मुख्यमंत्री बदलाची चर्चा आता थंडावली आहे.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPoliticsराजकारण