शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus News : जगन्नाथ रथयात्रा न्यायालयाकडून स्थगित; कारागिरांच्या डोळ्यांत आले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:15 AM

जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.

पुरी (ओदिशा) : जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथांची रथयात्रा यावर्षी कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे काढली जाणार नाही, हे वृत्त समजताच हा महारथ तयार करण्याचे काम असलेल्या असंख्य कारागिरांच्या डोळ्यांत पाणी आले. जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी दिलेल्या आदेशात नागरिकांच्या आरोग्यहितासाठी यावर्षी जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले. नऊ दिवसांचा हा रथयात्रा महोत्सव २३ जूनपासून सुरू होईल. श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती आणि सेवेकऱ्यांनी राज्य सरकारला विनंती केली की, त्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका करावी. १७३६ पासून ही रथ यात्रा कोणताही अडथळा न येता सुरू राहिली होती. १५५८ आणि १७३५ यादरम्यान मुघलांच्या स्वाऱ्यांमुळे ३२ वेळा रथयात्रा झाली नव्हती, असे जगन्नाथ संस्कृतीचे संशोधक भास्कर मिश्र यांनी सांगितले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बातमी वाचल्यावर मला धक्काच बसला. रथावर शेवटचा हात फिरवत असताना मला ही बातमी समजली,’ असे भगवान जगन्नाथ रथ ‘नंदिघोष’चे मुख्य सुतार बिजय कुमार महापात्रा यांनी सांगितले. ‘रथांचे काम पूर्ण झाल्यानंतर ते वापरले जाणार नाहीत अशी परिस्थिती याआधी कधी आल्याचे मी पाहिले नव्हते. मी लहानपणापासून रथनिर्मितीत गुंतलेला आहे. असे भगवान बलभद्र यांच्या ‘तलध्वज’ रथाचे मुख्य सुतार नरसिंह महापात्रा यांनी सांगितले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. महापात्रा म्हणाले, ‘जर रथ मंदिरासमोरील विशाल रस्त्यावर ओढलेच जाणार नसतील, तर आमची कोरोना चाचणी करून उपयोग काय? रथबांधणीचे काम करणाºयांपैकी अनेक जण म्हणाले की, ‘आम्ही पैशांसाठी हे काम करीत नाहीत, तर जगन्नाथांवरील प्रेम, आदर म्हणून. रथ खाला (मंदिराची कार्यशाळा) वगळता इतरत्र कुठेही आमच्यासह कोणीही असे सुंदर रथ तयार करू शकत नाहीत. कोणतेही औपचारिक शिक्षण नसलेले लोक एवढे आकर्षक रथ बनवू शकतात, ही भगवंतांचीच इच्छा आहे.’>रथयात्रा रोखणे हा मोठा कट -सरस्वतीभुवनेश्वर : भगवान जगन्नाथांची रथयात्रा होऊ न देण्याचा मोठा कट असल्याचा आरोप पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रविवारी केला.सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशात त्यानेच बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका राज्य सरकारने करावी, अशी विनंती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे गजपती महाराज दिव्यासिंघ डेब आणि सेवेकºयांनी केल्यानंतर सरस्वती यांनी हा आरोप केला आहे.एका व्हिडिओ मेसेजमध्ये शंकराचार्य म्हणाले की, ‘२० जून रोजी सर्वोच्च न्यायालय त्याच्या १८ जून रोजी दिलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका स्वीकारू शकले असते. सुटीच्या दिवसांतही महत्त्वाची प्रकरणे सुनावणीस घेणे ही रूढी आहे.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या