शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:06 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

अमरावतीः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून 'रायतू भरोसा' योजना लागू होणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,500 रुपये दिले जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपी सरकारची 'अन्नदाता सुखीभव' योजना रद्द केली आहे. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारनं फेब्रुवारी 2019ला निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत चंद्रबाबूंनी शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री झाल्यापासून जगनमोहन रेड्डी जलद गतीनं निर्णय घेत आहेत. तत्पूर्वी जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील पहिल्याच दिवशी वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश दिला आहे.

आंध्रच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वृद्धांची प्रतिमहिना पेन्शन वाढवून हजार रुपयांवरून तीन हजार करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपर्यंत प्रस्तावित ग्राम सचिवालयासाठी चाल लाख ग्राम स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत प्रतिमहिना पाच हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. जगनमोहन सरकारने दणक्यात सुरुवात करत राज्यातील आशा वर्कर्संच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. त्यानुसार, यापूर्वी 3 हजार रुपये वेतन घेणाऱ्या आशा वर्कर्संना आता 10 हजार रुपये वेतन मिळणार आहे. 

आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या बैठकीत जगनमोहन यांनी ही घोषणा केली. तसेच, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले आहेत. ग्रामीण स्तरावरील आशा वर्कर्स यांच्या कामाचे महत्व आणि त्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री जगनमोहन यांनी हा निर्णय घेतला आहे. जगनमोहन यांच्या प्रजा संकल्प यात्रेवेळी, काही आशा वर्कर्संने भेट घेऊन आपली करुण कहानी जगनमोहन यांना सांगितली होती. त्यावेळी रेड्डी यांनी या आशा वर्कर्संना वेतनवाढीचे आश्वासन दिले होते, ते आज पूर्ण केले आहे.ताडेपल्ली येथील या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठीच्या आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच, आरोग्य विभागात भ्रष्टाचार कदापी सहन केला जाणार नाही, अशी सूचनाही जगनमोहन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. या विभागासंदर्भात 45 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही जगनमोहन यांनी दिले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबूंच्या गडाल उद्धवस्त करत वायएसआर काँग्रेसचे सरकार स्थापन केले आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश