शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 23:10 IST

Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आले. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. याबाबत आता राजकारण चांगलेच तापलं आहे. यावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.

तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. मंगलगिरी येथील जनसेना पक्ष कार्यालयात पवन कल्याण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला. यावेळी ते (रेड्डी) माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते इतकेच म्हणू शकले असते की, जो कोणी दोषी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याचे मन शुद्ध असेल तर हे सर्व नाटक करण्याची गरज नाही, असे पवन कल्याण यांनी म्हटले.

पुढे पवन कल्याण म्हणाले की, रेड्डी यांनी स्थापन केलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाच्या देखरेखीखाली हा कथित घोटाळा झाला होता. टीटीडी हे तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे. तसेच, रेड्डी यांना दोष देत नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लाडूंमध्ये भेसळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या, म्हणून रेड्डी यांनी सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारच्या अंतर्गत व्यवस्थेला आपले काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सांगितले.

चंद्राबाबू नायडू यांनी केला होता आरोपआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. बुधवारी (१८ सप्टेंबर) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली आहे.

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश