शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करा अन् ५ हजार रुपये मिळवा!, जगन सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:13 IST

Jagan Mohan Reddy's Government : सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात जवळपास ३७००० लोक प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत.

ठळक मुद्देबंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्सचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामकाज केवळ बेकायदेशीरच नाही तर माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कायद्यांतर्गत गुन्हाही आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने (Jagan Mohan Reddy's Government) प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात जवळपास ३७००० लोक प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत. अशात कोरोना रूग्णांवर योग्य उपचार होऊ शकतील, यासाठी राज्य सरकारने प्लाझ्मा दान करण्यासाठी शिबिर सुरू केले आहे. (jagan mohan reddy government gives 5k to plasma donors and 15k to covid deceased for last rites)

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या निर्देशानुसार, या प्लाझ्मा दानसंदर्भातील कार्यक्रमाला चालना देण्यासाठी प्रत्येक प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला पाच रुपये देऊन मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी राज्य सरकारने १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

ब्लड बँकांच्या संपर्कातविशेष प्लाझ्मा दान कार्यक्रम मोहिमेविषयी अधिक माहिती देताना राज्य आरोग्य आयुक्त कटमनेनी भास्कर म्हणाले की, "पात्र प्लाझ्मा दान करणाऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात आहे आणि सध्या प्लाझ्मा असलेल्या ब्लॅड बँकांना संपर्क करण्यात येत आहे."

(CoronaVirus Live Updates : "ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही"; हायकोर्टाकडून कानउघाडणी)

दररोज १५ कोटी खर्च करतेय सरकारभास्कर यांनी सांगितले की, आरोग्य विभाग कॉल सेंटर कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना कॉल करेल आणि त्यांना प्लाझ्मा देणगी कार्यक्रमाबद्दल सांगेल. तसेच,  त्यांना प्लाझ्मा दान करण्यास आणि इतरांचे प्राण वाचविण्यास राजी करेल." दरम्यान, सध्या अन्न, गृहनिर्माण, औषधे आणि चाचण्यांसह एकूण कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार दररोज सुमारे १५ कोटी रुपये खर्च करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना नियमितपणे राज्यातील कोरोना स्थितीविषयी अपडेट केले जात आहे.

आतापर्यंत ८, २८९ लोकांचा मृत्यू दरम्यान, आंध्र प्रदेशात मंगळवारी कोरोना संसर्गाचे २०,०३४ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ११,८४, ०२८ वर गेली आहे. हेल्थ बुलेटिनच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एकूण १०,१६,१४२ लोक बरे झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे आतापर्यंत ८, २८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात १,५९,५९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेश