जगदंबा देवी मंदिरात महापूजा
By Admin | Updated: December 22, 2014 01:21 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-22T01:21:56+5:30
वणी : येथील जगदंबा देवी मंदिरात धंदूरमास निमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

जगदंबा देवी मंदिरात महापूजा
वणी : येथील जगदंबा देवी मंदिरात धंदूरमास निमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
संक्रांतीच्या पर्वकाळातील धंदूरमास कालावधीत प्रथम रविवारी विशेष पूजेच्या परंपरेला अनुसरून तीळमिश्रित दुधाने स्नान करण्यात येऊन जगदंबेला महावस्त्र डोक्यावर लाल चुनरी, कानात कर्णफुले, गळ्यात मंगळसूत्र व अन्य अलंकाराबरोबर साजशृंगार व फुलांची सजावट करण्यात आली होती.
यादिवशी सूर्योदयसमयी देवीला नैवद्य दाखविण्यात आला. मंत्रोच्चाराच्या सााने पार पडलेल्या पूजाविधीस महिलावर्ग व ग्रामस्थांनी हजेरी लावली.