तहसील कार्यालयात झाला जादूटोणा पंढरपूर : मानवी कवटी, हाडे व लिंबूंची टाचणी टोचून झाली पूजा
By Admin | Updated: June 17, 2015 01:33 IST2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30
१६पंड०१, ०२

तहसील कार्यालयात झाला जादूटोणा पंढरपूर : मानवी कवटी, हाडे व लिंबूंची टाचणी टोचून झाली पूजा
१ पंड०१, ०२फोटो - पंढरपुरात येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जादूटोणा करण्यासाठी मानवी कवटी व हाडांची पूजा करण्यात आली. याची पाहणी करताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, तहसीलदार गजानन गुरव, पोनि. किशोर नावंदे, पोनि. दयानंद गावडे. (छाया - सचिन कांबळे)पंढरपूर : सध्याच्या युगात सर्वत्र अत्याधुनिक व विकसनशील प्रणाली आल्याने अंधश्रद्धा कमी झाली असे अनेक जण म्हणत असले तरी मात्र पंढरपुरातील तहसील कार्यालयाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने अमावस्या गाठून मानवी कवटी व हाडांची पूजा करून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याने आजही अंधश्रद्धेतून मानव मुक्त झाला नसल्याचे चित्र पंढरपुरात पाहावयास मिळाले.पंढरपुरतील तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालयाच्या शेजारी अज्ञात व्यक्तीने मानवी कवटी, हाडे त्याचबरोबर हळदी-कुंकू व टाचण्या टोचलेल्या लिंबांची अघोरी पूजा केली आहे. दस्त लेखक सुधीर उर्फ तात्या महाराज सुरेश साळंुखे अंधश्रद्धेच्या गोष्टींवर जादा विश्वास ठेवतात. हे जाणून घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने साळंुखे रोज दस्त लेखन करण्यासाठी बसत असलेल्या ठिकाणी ही अघोरी पूजा केली आहे. यामुळे सुधीर उर्फ तात्या महाराज साळंुखे घाबरले असून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. याबाबत तहसीलदार गजानन गुरव यांनी पोलिसांना पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत.घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, तहसीलदार गजानन गुरव, पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर पोलिसांनी पूजेच्या ठिकाणावरील मानवी कवटी व हाडे व पूजेचे साहित्य ताब्यात घेतले. कोट -तहसील कार्यालयाच्या आवारात मी ऑनलाईन दस्त लेखनाचे काम करतो. माझा व्यवसाय तेजीत आहे, त्यामुळे माझ्या स्पर्धकांनी दुष्ट हेतूने हा प्रकार केला आहे. - सुधीर उर्फ तात्या महाराज साळंुखेदस्त लेखनिक