जैका

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:06+5:302015-08-11T23:16:06+5:30

चर्चिलचे भवितव्य उद्या

Jacka | जैका

जैका

्चिलचे भवितव्य उद्या
चर्चिल आलेमाव यांच्या जामीनवर गुरुवारी पणजी विश्ेष न्यायालयात सुनावणी होणार असून त्यापूर्वी टाकण्यात आलेला हा छापा त्यांना जामीन मिळण्यासाठी अडचणीचा ठरण्याचीही शक्यता आहे. चर्चिलला जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांनी खेळलेला तो डावपेचही आहे.

संशयितांच्या नजरा चर्चिलच्या जामीनवर
जैका प्रकरणातील सर्व संशयितांच्या नजरा आता चर्चिल आलेमाव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर खिळल्या आहेत. चर्चिलच्या अर्जावर 13 रोजी सुनावणी होणार असल्यामुळे आणि त्याच दिवशी जामीनसाठी अर्ज केलेल्या इतर तिन्ही संशयितांनी आपल्या अर्जावर त्यानंतर म्हणजे 14 रोजी सुनावण्या ठेवण्याची मागणी न्यायालयाला केली व ती न्यायालयाकडून मंजूरही करण्यात आली.
शुक्रवारी सुनावणी होणार असलेल्यांत हवाला एजंट रायचंद सोनी, लुईस बर्जर कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती, आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांचा समवावेश आहे. मोहंती यांच्या वकिलाला जेव्हा पुढील सुनावणी केव्हा हवी, असे न्यायालात विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी 14 रोजी सुनावणी घेण्यात यावी, असे त्याने सांगितले. त्यानंतर वाचासुंदर यांची आणि सोनी यांच्या जामीन अर्जावरील सुनावण्याही 14 रोजी म्हणजे शुक्रवारीच ठेवण्यात आल्या.

वाचासुंदरचा ‘पोपट’
जैका प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर कोठडीतील तपासाच्यावेळी वाचासुंदर यांनी गुन्?ाची कबुली दिली नव्हती. क्राईम ब्रँचने वेगवान तपास करून एकापेक्षा एक साक्षीदार आणून उभे केल्यामुळे ते अडचणीत आले. शेवटी ते कबुली जवाब देण्यास तयार झाले आणि तो नोंदविलाही. मंगळवारी त्यांच्या जामीन अर्जाच्यावेळी त्यांचा हाच कबुली जवाब त्यांना नडला. आपल्या डोळ्यांदेखत दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव यांना लाच दिल्याची वाचासुंदर यांनी स्वत:च कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांना जामीन देता कामा नये, असे पोलिसांच्या वकिलानेच सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आपला ‘पोपट’ बनविल्याचे त्यांना कळून चुकले.

Web Title: Jacka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.