शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हे तर आपचे नकारात्मक राजकारण, गौतम गंभीरचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 15:17 IST

दोन मतदार ओळखपत्रे सोबत बाळगल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेला माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीतील भाजपाचा उमेदवार गौतम गंभीर याने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली - दोन मतदार ओळखपत्रे सोबत बाळगल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेला माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीतील भाजपाचा उमेदवार गौतम गंभीर याने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. साडे चार वर्षांत दिल्लीमध्ये काही विशेष करता न आल्याने आपकडून नकारात्मक राजकारण करण्यात येत आहे. आता या आरोपाबाबत निवडणूक आयोगच काय तो अंतिम निर्णय घेईल, असे गंभीरने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी आणि काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांचे आव्हान आहे. दरम्यान, गौतम गंभीरजवळ राजेंद्र नगर आणि करोल बागमधील दोन मतदान कार्ड आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्याला एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपच्या उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गंभीर म्हणाला की, ''जेव्हा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे व्हिजन नसते. तसेच तुम्ही साडे चार वर्षांत काहीही काम केलेले नसते तेव्हा तुम्ही असे नकारात्मक आरोप करू लागता.आता यावर निवडणूक आयोगच निर्णय घेईल. मात्र जेव्हा तुमच्याकडे व्हिजन असते तेव्हा तुम्हाला नकारात्मक राजकारण करावे लागत नाही,'' असा टोला गौतम गंभीरने लगावला. 

दरम्यान, पूर्व दिल्लीमध्ये विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. तर गंभीरने नाव दोन ठिकाणी असल्याच्या विरोधात आपने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती. यावर 1 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019east-delhi-pcपूर्व दिल्ली