आयटम गर्ल म्हणजे वारांगनाच - हिंदू महासभेच्या नेत्याची मुक्ताफळे
By Admin | Updated: December 3, 2014 09:41 IST2014-12-03T09:40:58+5:302014-12-03T09:41:14+5:30
अंगप्रदर्शन करणा-या ज्या तरुणी स्वतःला आयटम गर्ल म्हणवून घेतात त्या वारांगना असून समाजाने त्यांच्यावर बंदीच घालायला हवी अशी मुक्ताफळे हिंदू महासभेचे नेते नवीन त्यागी यांनी उधळली आहेत.

आयटम गर्ल म्हणजे वारांगनाच - हिंदू महासभेच्या नेत्याची मुक्ताफळे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - अंगप्रदर्शन करणा-या ज्या तरुणी स्वतःला आयटम गर्ल म्हणवून घेतात त्या वारांगना असून समाजाने त्यांच्यावर बंदीच घालायला हवी अशी मुक्ताफळे हिंदू महासभेचे नेते नवीन त्यागी यांनी उधळली आहेत.
मंगळवारी एका वृत्तवाहिनी बोलताना त्यागी यांनी संस्कृती रक्षक असल्याचे सांगत महिलांविषयीची त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे. 'पडद्यावर अंगप्रदर्शन करणा-या तरुण ज्या स्वतःला आयटम गर्ल म्हणवून घेतात त्यांना कधीच कलाकार म्हणता येणार नाही' असे त्यागी यांनी म्हटले आहे. उत्तरपद्रेशमधील हिंदू महासभेचे पदाधिकारी जानेवारी २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टात आयटम गर्लला वेश्याचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारी याचिकाही करणार आहेत असे त्यागींनी नमूद केले. यापूर्वी अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष धर्मपाल सिवाच यांनीही समाजामधील वाढत्या अश्लीलतेसाठी महिलांचे छोटे कपडेच कारणीभूत असल्याचे विधान केले होते.