आयटीबीपीच्या लवकरच 12 बटालियनला मंजुरी

By Admin | Updated: October 28, 2014 02:15 IST2014-10-28T02:15:30+5:302014-10-28T02:15:30+5:30

भारत-चीन सीमेची सुरक्षा करणा:या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या 12 बटालियन गठित करण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आह़े

ITBP soon approves 12 battalions | आयटीबीपीच्या लवकरच 12 बटालियनला मंजुरी

आयटीबीपीच्या लवकरच 12 बटालियनला मंजुरी

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेची सुरक्षा करणा:या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या 12 बटालियन गठित करण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आह़े चीनलगतच्या सीमेवर लष्कराचा पहारा वाढविण्याच्या दृष्टीने आयटीबीपीत सुमारे 12 हजार नवे जवान भरती करण्याचा सरकारचा मानस आह़े
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रलयाने ‘तत्त्वत:’ मंजुरी दिली आह़े गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गत आठवडय़ात आयटीबीपीच्या स्थापनादिनी अरुणाचल प्रदेशात आयटीबीपीच्या 54 नव्या सीमा चौक्या स्थापन करण्याची घोषणा केली होती़ 
अरुणाचल प्रदेशातील या अतिरिक्त चौक्यांसाठी एक डझनापेक्षा अधिक बटालियन गठित करण्याची गरज आह़े त्यानुसार, येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने या बटालियन गठित केल्या जातील़(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
 

 

Web Title: ITBP soon approves 12 battalions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.