ATM पूर्ववत व्हायला दोन ते तीन आठवडे लागतील - अरुण जेटली
By Admin | Updated: November 12, 2016 16:18 IST2016-11-12T16:17:34+5:302016-11-12T16:18:32+5:30
५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर चलन तुटवडा निर्माण झाला आहे. बँकांमध्ये मर्यादीत स्वरुपात व्यवहार सुरु असले तरी..

ATM पूर्ववत व्हायला दोन ते तीन आठवडे लागतील - अरुण जेटली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - चलन तुटवडयामुळे लोकांचे हाल होत असताना देशातील सर्व एटीएम मशीन्स पूर्ण क्षमतेने चालू व्हायला अजून दोन ते तीन आठवडे लागतील असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर चलन तुटवडा निर्माण झाला आहे.
बँकांमध्ये मर्यादीत स्वरुपात व्यवहार सुरु असले तरी एटीएम मशीन्स अजूनही बंद असल्याने लोकांचे हाल होत आहेत. खात्यात पैसे आहेत पण रोजच्या दैनंदिन गरजांसाठी हातात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. सध्याच्या एटीएम मशीन्समध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा देण्याची रचना आहे.
आणखी वाचा
नव्या ५०० आणि २ हजारच्या नोटांसाठी एटीएमची रचना बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. देशातील सर्व एटीएम मशीन्स पूर्ण क्षमतेने चालू व्हायला अजून दोन ते तीन आठवडे लागतील असे जेटली यांनी सांगितले. नव्या नोटांसाठी आधीच एटीएम मशीन्सची रचना बदलली असती तर गुप्तता राहिली नसती असे जेटलींनी सांगितले.
थेट ८६ टक्के जुने चलन बदलले गेल्याने बँकांमध्ये गर्दी होणे अपेक्षित होते. बँकांचे कर्मचारी दिवसरात्र काम करत असून लोकही त्यांना सहकार्य करत आहेत असे जेटली यांनी सांगितले. वेगवेगळया प्रतिक्रिया येत असून काही राजकीय नेते बेजाबबदार वक्तव्ये करत आहेत असे जेटलींनी सांगितले.