..तरी गोव्यात o्रीराम सेना स्थापणारच - मुतालिक
By Admin | Updated: June 26, 2014 01:53 IST2014-06-26T01:53:57+5:302014-06-26T01:53:57+5:30
o्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच o्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे. ही एक देशप्रेमी संघटना आहे.

..तरी गोव्यात o्रीराम सेना स्थापणारच - मुतालिक
>फोंडा : o्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच o्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे. ही एक देशप्रेमी संघटना आहे. मात्र, कोणी कितीही विरोध केला तरी येत्या सप्टेंबर्पयत गोव्यात सेनेची शाखा सुरू करणार, असा निर्धार o्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी रामनाथी बांदोडा येथे बुधवारी व्यक्त केला.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने ते आले होते. गोव्यात श्रीराम सेनेचे मोठय़ा प्रमाणात समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक हिंदू संघटनांशी संबंधित लोक गोव्यात o्रीराम सेना स्थापन करण्याबाबत आग्रही आहेत. या संदर्भात एक बैठकही यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी दिली. संघटनेचे कार्य गोव्यात सुरू झाल्यास काँग्रेस तसेच विद्यमान भाजप सरकारची लाचखोरी, भ्रष्टाचार यांसारख्या कृत्यांत गुंतलेल्यांच्या भानगडी उघड होण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे काही राजकीय नेते व ािश्चन समुदाय श्रीराम सेनेला घाबरत आहे. विरोध करणा:यांना तुम्ही तुमची ताकद लावा, आम्ही आमची ताकद लावू, असे उघड आव्हानही मुतालिक यांनी दिले. मागील गोवा भेटीवेळी मुतालिक यांनी प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवावी, असे आवाहन केले होते. (प्रतिनिधी)