चर्चा तर होणारच!

By Admin | Updated: February 3, 2017 00:26 IST2017-02-03T00:26:18+5:302017-02-03T00:26:18+5:30

जिल्हा परिषदेला नाही तर कारखान्याला उमेदवारी द्या!

It will be discussed! | चर्चा तर होणारच!

चर्चा तर होणारच!

ल्हा परिषदेला नाही तर कारखान्याला उमेदवारी द्या!
करवीर तालुक्यातील एका स्त्री राखीव मतदार संघातील एका खेडेगावात मुख्य चौकात युवकांची बैठक सुरू होती. वेळ सकाळी आठ वाजल्याची होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत युवक कार्यकर्त्यांच्यामध्ये चर्चा रंगत होत्या. इतक्यात त्या तरूणांच्या घोळक्याकडे महिला उमेदवारांचे पतीदेव आले आणि तरूणांना उद्देशून म्हणाले, आमच्या नेत्यांकडे तिकीटाची मागणी केली, साहेबांनी जिल्हा परिषदेला उमेदवारी नाही दिली तर कारखान्याला उमेदवारी द्यावीच लागणार. त्यावर तरूण कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत घ्या... घ्या... असे म्हणत सार्‍यांनी माना हलविल्या.
- शिवराज लोंढे,
---------------

Web Title: It will be discussed!