शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 22:17 IST

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे.

माजी निवडणूक रणनीतीकार तथा जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. तसेच, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र, यावेळीही ते पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकता, अशे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनी सोबत बोलत होते. यावेळी, काँग्रेस या निवडणुकीत 100 चा आकडा पार करेल का? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांच्या संख्येत मोठा बदल होण्याची शक्यता नाही. जागांची संख्या 50-55 झाली तर देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र, काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नाही. आजच्या घडीला हे अवघड आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'भाजपच्या 370 वर काय म्हणाले प्रशांत किशो' -भाजपच्या 370 जागांच्या लक्ष्यासंदर्भात विचारले असता किशोर म्हणाले, "भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. लोकांनी 370 चे लक्ष्य खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला आपले लक्ष्य निर्धारित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर ते खूप छान, मात्र हे शक्य झाले नाही, तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत विनम्र असायला हवे." किशोर यांच्या मते, 2014 नंतर अशा 8-9 निवडणुका झाल्या ज्यात भाजपला आपले निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.

'भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात काय म्हणाले पीके? -प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजप एकट्याच्या बळावर 370 जागा मिळवू शकणार नाही, असे मी म्हणू शकतो. मी, ही शक्यता जवळजवळ शून्य मानतो. असे घडल्यास मला आश्चर्य वाटेल. किशोर म्हणाले, संदेशखालीसारख्या घटना घडल्यास, ते सत्ताधारी पक्षासाठी निश्चितपणे नुकसानाचे कारण ठरेल. महत्वाचे म्हणजे, त्यांचे म्हणणे होते की, भाजप 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जिंकलेल्या जागांवरून खाली येणार नाही. गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'बाबत किशोर म्हणाले की, लोकसभा निवडणुका जवळ आली असताना, ही यात्रेची वेळ नाही.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण