आजच्या ज्वलंत प्रश्नांवर बाबासाहेबांनी तेव्हाच केले होते भाष्य

By Admin | Updated: February 5, 2016 00:34 IST2016-02-05T00:34:11+5:302016-02-05T00:34:11+5:30

प्रा.हरि नरके : शासकीय अभियांत्रिकीत डॉ आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त व्याख्यान

It was only when Baba Saheb had said that today's burning question was done by Babasaheb | आजच्या ज्वलंत प्रश्नांवर बाबासाहेबांनी तेव्हाच केले होते भाष्य

आजच्या ज्वलंत प्रश्नांवर बाबासाहेबांनी तेव्हाच केले होते भाष्य

रा.हरि नरके : शासकीय अभियांत्रिकीत डॉ आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त व्याख्यान
जळगाव : आपल्याला भेडसावणार्‍या समस्यांवर शासनातर्फे आज उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र या विषयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंनी त्या काळातच उपाययोजनांसाठी प्रयत्न केला होता. मात्र त्या काळच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याने त्या आज आपल्याला भेडसावत आहे. समाजाला बाबासाहेबांची ओळख अजूनही अपूर्ण असल्याचे मत महात्मा फुले अध्ययन केंद्र पुणे विद्यापीठाचे प्रमुख प्रा. हरि नरके यांनी केले.
शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षा निमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्राचार्य आर.पी. बोरकर, प्रा.आर.आर. लांडगे, प्रा. व्ही.आर. सराफ उपस्थित होते.
माझी ओळख भारतीय
ते म्हणाले की,जात, धर्म, प्रांत, संस्कृतीवर आपली ओळख मला मान्य नाही मी फक्त भारतीय आहे ही माझी ओळख योग्य असल्याचे बाबासाहेबांनी विधानसभेतील आपल्या भाषणात सांगीतले होते.
महिलांना न्याय मिळाला नसता
धर्माच्या राज्य घटनेमुळे महिलांना न्याय मिळला नसता. त्याचेे ताजे उदाहरण म्हणजे शनि शिंगणापूर आहे. तेथे चारशे वर्षांपूर्वीची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. समाजाने जुन्यासकट नवीन व संस्कृतीतील अभिमानास्पद गोष्टी स्विकारायला पाहिजे. परंपरेत जे उदात्त आहे ते घ्यायचे असल्याचे त्यांनी सांगीतले.
(जोड आहे)

Web Title: It was only when Baba Saheb had said that today's burning question was done by Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.