शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयटी क्षेत्राच्या महसुलातील वाढ होऊ शकेल दोन अंकी - अजीम प्रेमजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 10:43 IST

चालू वित्त वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वृद्धीदर दोन अंकी झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. साथीच्या काळातही हे क्षेत्र २ ते ३ टक्क्यांनी वाढले. वित्त वर्ष २०२१ मध्ये या क्षेत्राने शुद्ध स्वरूपात १.५८ लाख नव्या नोकऱ्या दिल्या.

बंगळुरू : भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा महसूल चालू वित्त वर्षात वाढून दोन अंकी होईल, असे प्रतिपादन विप्रोचे संस्थापक-चेअरमन अजीम प्रेमजी यांनी केले आहे. ‘बॉम्बे चार्टर्ड अकाऊंटंट्स सोसायटी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रेमजी यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात माहिती तंत्रज्ञान उद्योगाने जग धावते ठेवले. या उद्योगाने स्वत:ही नवे बदल स्वीकारले. त्यामुळे या क्षेत्रातील वृद्धीची गती जबरदस्त आहे. 

चालू वित्त वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वृद्धीदर दोन अंकी झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. साथीच्या काळातही हे क्षेत्र २ ते ३ टक्क्यांनी वाढले. वित्त वर्ष २०२१ मध्ये या क्षेत्राने शुद्ध स्वरूपात १.५८ लाख नव्या नोकऱ्या दिल्या.

प्रेमजी म्हणाले की, आयटी क्षेत्राने साथ काळात स्वत:मध्ये आवश्यकतेनुसार बदल घडविले. ‘वर्क फ्रॉम होम’ स्वीकारले गेले. आजही ९० टक्के कर्मचारी घरून काम करीत आहेत. काही प्रमाणात कार्यालयांतून, तर काही प्रमाणात घरून काम करण्याच्या हायब्रीड पद्धतीचाही सोयीनुसार वापर केला जात आहे. हे भविष्यातील कार्य मॉडेल म्हणून कायम होऊ शकते.

शिक्षकांचे लसीकरण करून शाळा सुरू कराअजीम प्रेमजी यांनी सांगितले की, देशातील सर्व शिक्षकांचे लसीकरण करून शाळा लवकरात सुरू करायला हव्यात. मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे मुलांचे प्रचंड नुकसान होत असून, त्याकडे दुर्लक्ष करणे मोठी चूक ठरेल. मुलांना पुढच्या वर्षात ढकलून तुम्ही त्यांच्यात शिक्षणाची मोठी तूट निर्माण करीत आहात. ती कधीच भरून निघणार नाही.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानbusinessव्यवसाय