शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवणे योग्य आहे का ?- सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 08:53 IST

सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गुन्ह्यांतील आरोपींना निवडणूक लढवण्यास देणे योग्य आहे का ?, त्यावर आम्ही निर्णय दिल्यास तो संसदेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप ठरेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आम्ही लक्ष्मण रेखा पार करू इच्छित नाही. तसेच अशा उमेदवारांना पक्षाच्या चिन्हापासून दूर केले जाऊ शकते का ?, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं अॅटर्नी जनरल यांना विचारला आहे. भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना अयोग्य ठरवण्याचा अधिकार कायदा तयार करणा-या संसदेला आहे. ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे. तसेच निवडणूक आयोग त्या उमेदवारांना पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास मज्जाव करू शकत नाही का ?, कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोग असा प्रशासकीय निर्णय घेऊ शकतो, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले, उमेदवार हा प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देतो. जोपर्यंत आरोपांमध्ये तो गुन्हेगार सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या उमेदवाराला दोषी समजणं योग्य आहे का ?, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय अप्रत्यक्षरीत्या उमेदवाराच्या विरोधातच नव्हे, तर राजकीय पक्षांवरही प्रतिबंध घालेल. त्यामुळे असा निर्णय घेणे योग्य नसल्याचं स्पष्टीकरण अॅटर्नी जनरल यांनी दिलं आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय