शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सुकामेव्याच्या दोन कंपन्यांवर छापे; पुण्यासह ६ राज्यांत अनेक कार्यालयांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 06:07 IST

IT raids : दाेन कंपन्या बदाम, काजू, किशमिश, पिस्ता इत्यादी सुका मेव्याची विक्री करतात. एका कंपनीची अमृतसर आणि दिल्लीत मुख्य कार्यालये आहेत.

लुधियाना : सुकामेवा विकणाऱ्या दाेन माेठ्या कंपन्यांच्या प्रतिष्ठानांवर प्राप्तिकर खात्याने छापे टाकले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील कंपन्यांची कार्यालये, तसेच निवासी मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर करचाेरी केल्याचा संशय आहे.

लुधियाना येथील केसरगंज मंडीमध्ये एका कंपनीच्या कार्यालयात प्राप्तिकर खात्याचे अधिकारी गुरुवारीच दाखल झाले हाेते. त्यानंतर कारवाई सुरू झाली. दाेन कंपन्या बदाम, काजू, किशमिश, पिस्ता इत्यादी सुका मेव्याची विक्री करतात. एका कंपनीची अमृतसर आणि दिल्लीत मुख्य कार्यालये आहेत. दुसऱ्या कंपनीचे मुख्यालय जम्मू येथे आहे. देशाच्या विविध राज्यांत दाेन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सुका मेव्याशिवाय कंपन्यांचा माेठा ऑनलाइन व्यवसायही असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपन्यांनी प्रत्यक्ष विक्री आणि नफ्याचे आकडे लपवून प्रचंड करचाेरी केल्याचा प्राप्तीकर खात्याला दाट संशय आहे. मुंबई, अमृतसर, दिल्ली आदी शहरांमधील कार्यालयांमध्ये छापे टाकले आहेत. ही कारवाई आणखी १-२ दिवस चालू शकते, असा अंदाज आहे.

कर चुकविण्यासाठी...-    मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तीकर विभागाचे पथक आयात-निर्यातीचा व्यवसाय असलेल्या मोठ्या व्यक्तीच्या शोधात आहे. या व्यक्तीची कंपनी ही पंजाबमधील क्रमांक एकची असल्याचे समजले जाते.-    ही कंपनी कर चुकवण्यासाठी बिल न करता रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करीत असल्याचा विभागाचा संशय आहे.-   हे गट प्रत्यक्ष विक्री आणि नफा दडवून ठेवून कर चुकवत असल्याचा संशय असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानraidधाड