शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संसद वारंवार तहकूब होणे देशहिताचे नाही : व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:35 IST

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.

नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेली कोंडी दूर करण्याचा आग्रह काँग्रेसने कायम ठेवल्यामुळे शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गुरुवारी काँग्रेसच्या याच ठाम भूमिकेमुळे सभागृहात कामकाज बंद पडले व त्यामुळे क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना त्यांचे सभागृहातील पहिले भाषणही करता आले नव्हते.संसदेचे कामकाज सध्या सुरू असते ते अधूनमधूनच. हे काही देशाच्या हिताचे नाही, असे नायडू म्हणाले. ते येथे इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर आणि इंटेग्रेटेड ट्रान्झिट कॉरीडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. नायडूम्हणाले, सर्वांना सामावून घेणाºया आर्थिक विकासाची भूमिका घेऊन भारताला जागतिक आर्थिक नेता बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.एकोप्याने राहण्याची संस्कृती-देशावर पूर्वी झालेल्या आक्रमणांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की या देशाची संस्कृती दहा हजार वर्षांची असून भारताने कोणावर कधी आक्रमण केल्याची नोंद नाही.आम्ही एकोप्याने राहू इच्छितो. आक्रमणापूर्वी जगाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) भारताचा वाटा २७ टक्के होता.लवकरात लवकर आर्थिक विकास ७.५ टक्क्यांच्या पलीकडे नेऊन दोन दोन आकडी होण्यासाठी आम्ही सगळ््यांनी काम केले पाहिजे, याचा विसर पडू नये, असे ते म्हणाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूGovernmentसरकारParliamentसंसद