शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाळूत तोंड खुपसून बसणे ही सकारात्मकता नाही, राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा भाजप, RSS वर हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 06:39 IST

बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की,‘वाळूत तोंड खुपसून घेणे म्हणजे सकारात्मकता नाही तर देशवासीयांची फसवणूक आहे.’

  नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला असून देशात दुबळी आरोग्य व्यवस्था उघड झाली. डॉक्टर्स, परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना असहाय करून साेडले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रम आयोजित केले जावेत आणि त्यादिशेने पावले टाकावीत, अशी योजना तयार केल्याचे समोर आल्यावर या कार्यक्रमावर अनेक विऱोधी पक्षांनी आणि विश्लेषकांनी टीका केली आहे.बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की,‘वाळूत तोंड खुपसून घेणे म्हणजे सकारात्मकता नाही तर देशवासीयांची फसवणूक आहे.’ निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही भाजप-संघाच्या योजनेवरून सरकारवर ट्वीटरद्वारे टीका केली. ते म्हणाले,‘देश शोकात असताना आणि आमच्या चारही दिशांना वेदनादायी घटना घडत असताना सकारात्मकतेच्या नावावर खोटेपणा आणि प्रचार करणे लाजिरवाणी बाब आहे. सकारात्मक व्हायचे असेल तर आम्हाला आंंधळे होऊन सरकार प्रचार वा गाजावाजा करणारे बनायला नको आहे.’खासदार राहुल गांधी यांनी त्या कार्यक्रमाबाबत प्रसारमाध्यमात आलेल्या एका बातमीचा हवाला देऊन म्हटले की, ‘सकारात्मक विचारांचा खोटा दिलासा हा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती गमावली, जे रुग्णालयात प्राणवायू, औषधांच्या टंचाईला तोंड देत आहेत आणि आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची थट्टा करणारा आहे. वाळूत तोंड खुपसून बसणे ही सकारात्मकता नाही तर देशवासीयांची फसवणूक आहे.’

व्याख्याने होणार...- व्याख्याने, भाषणे होतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘सकारात्मकता असीमित’ नावाचा एक ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध प्रेरक, धार्मिक गुरू आणि प्रमुख उद्योगपतींची- व्याख्याने आणि भाषणांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाचा विषय सकारात्मकता पसरवण्याचा असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन - भागवतदेखील या सकारात्मकता अभियानाअंतर्गत राष्ट्राला संबोधित करू शकतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ