(वाचली) वक्तृत्वकला जोपासणे आवश्यक : पाटील
By Admin | Updated: December 14, 2014 00:45 IST2014-12-14T00:45:59+5:302014-12-14T00:45:59+5:30
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधीलकी जपण्याच्या दृष्टीने वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य असून, प्रभावी संप्रेषणासाठी वक्तृत्वकला जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायतीचे शिक्षणविस्तार अधिकारी आर. डी. पाटील यांनी येथे बोलताना केले.

(वाचली) वक्तृत्वकला जोपासणे आवश्यक : पाटील
क ल्हापूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधीलकी जपण्याच्या दृष्टीने वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य असून, प्रभावी संप्रेषणासाठी वक्तृत्वकला जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायतीचे शिक्षणविस्तार अधिकारी आर. डी. पाटील यांनी येथे बोलताना केले. श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देशभूषण हायस्कू ल, दादासाहेब मगदूम हायस्कूल आणि ॲड. के. ए. कापसे विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय देशभूषण वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक डी. एस. लडगे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. मुख्याध्यापक एस. आर. भेंडे यांनी प्रास्ताविक केले. सहायक शिक्षक एस. बी. मिठारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आर. ए. गाट यांनी आभार मानले. यावेळी महावीर देसाई, कांचनताई कापसे, ॲड. अभिजित कापसे, प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे, आदी उपस्थित होते. -------------------------------------------------------------------------------------------फोटो क्रमांक - १३१२२०१४-कोल-देशभूषण ओळ : कोल्हापुरात राज्यस्तरीय देशभूषण वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करताना शिक्षणविस्तार अधिकारी आर. डी.पाटील. सोबत डावीकडून आर. ए. गाट, डी. एस. लडगे, ॲड. अभिजित कापसे, एम. बी. देसाई, आदी उपस्थित होते.