शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासाचे भाडे कमी करणे सरकारच्या हातात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 08:41 IST

भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : गगनाला भिडणारे हवाई प्रवासाचे भाडे रोखणे सरकारच्या हातात नाही. या मुद्द्यावर सरकारने हात वर केले आहेत. यासाठी कोणत्याही कायद्यात तरतूद नसल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, जुलैपासून प्रवासभाडे कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

हवाई प्रवास भाड्यातील अंदाधुंद वाढ रोखण्याचे सरकारचे सर्व उपाय अयशस्वी ठरले आहेत. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची देशांतर्गत विमान कंपन्यांशी अनेकदा चर्चा होऊनही हे शक्य झालेले नाही. जगातील सर्व देशांमध्ये एव्हिएशन कंपन्यांच्या भाड्यावर कोणत्याही सरकारचा दबाव अथवा नियंत्रण असत नाही. त्या कंपन्या स्वत:च भाडे निश्चित करतात, हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. हवाई प्रवास भाडे निश्चित करण्याच्या स्वातंत्र्याला त्या देशाच्या एव्हिएशन सेक्टरशी जोडून पाहिले जात आहे. 

भाडेवाढीची कारणेभारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. दरवर्षीच्या वाढीचा दर ३६.१० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी २०२२मध्ये जानेवारी ते मेपर्यंत हवाई प्रवाशांची संख्या ४६७.३७ लाख होती. ती २०२३च्या जानेवारी ते मेमध्ये वाढून ६३६.०७ लाख झाली आहे.गो एअर बंद होण्याचे कारणही भाडेवाढीमागे सांगितले जात आहे. ज्या मार्गांवर गो एअरची जास्त विमाने होती, तेथील हवाई प्रवास भाडे गगनाला भिडले आहे.

कारवाई करू शकत नाही- नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व त्यांचे संपूर्ण मंत्रालय हवाई प्रवास भाड्याच्या वाढीवर नजर ठेवून आहे. परंतु हवाई कंपन्यांना लगाम घालणे शक्य नाही. - यासाठी कोणताही कायदा परवानगी देत नाही. एकमेव सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाचीही सरकारने विक्री केली आहे. त्यामुळे आता सरकारचे कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. - बेजबाबदारपणा किंवा नियमांचे उल्लंघन केल्यावरून एअरलाइन्सविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. विमानांची उड्डाणे रोखली जाऊ शकतात. दंड लावला जाऊ शकतो. परंतु हवाई प्रवास भाड्याबाबत कोणतीही कारवाई करू शकत नाही.

पुढील महिन्यापासून विमान प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यतासर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते व जुलैपासून पुन्हा प्रवाशांची संख्या कमी होते. त्यामुळे सरकार व डीजीसीएच्या सर्व नजरा जुलै महिन्यावर आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, पुढील महिन्यापासून विमान प्रवास भाडे काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल.

विमान कंपन्यांमध्ये नफा वसुलीची स्पर्धा एवढी वाढली आहे की, भाड्यात ३०० ते ४०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एकेकाळी कंपन्या स्वस्त प्रवासाची ऑफर देत होत्या. परंतु तो काळ आता संपताना दिसत आहे.

मागील महिन्यात ८१.१० लाख प्रवाशांना हवाई सफर करवून इंडिगो सर्वांत जास्त प्रवाशांना हवाई सफर घडवणारी कंपनी झाली आहे. देशात हवाई प्रवासातील ६१.४ टक्के हिस्सा मागील महिन्यात मेमध्ये इंडिगोने प्राप्त केला आहे. 

टॅग्स :airplaneविमान