शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
3
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
4
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
5
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
6
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
8
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
9
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
10
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
11
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
12
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
13
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
14
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
15
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
16
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
17
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
18
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
19
तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक
20
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:44 IST

संशोधनात, मुले, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तिन्ही वयोगटांवर याचा परिणाम जवळपास सारखाच आढळला

नवी दिल्ली : तुम्ही दररोज तासभर ‘रील’ स्क्रोल करता आणि त्यानंतर तुमचा मेंदू सुस्त, जड किंवा अस्वस्थ वाटतो का? नव्या या अभ्यासानुसार, सतत रील किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहणे लक्ष, स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य कमकुवत करते. जेवढे जास्त आपण स्क्रोल करतो, तेवढीच आपल्या मेंदूची खोलवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. सायकोलॉजिक बुलेटिनच्या अभ्यासानुसार, रील मेंदूत जलद, नवीन आणि त्वरित आनंद देणाऱ्या उत्तेजनांचा पूर आणतात.

एक स्क्रोल अन् एक ‘किक’प्रत्येक वेळी आपण स्क्रोल करतो, तेव्हा एक छोटी ‘डोपामाईन किक’ मिळते. डोपामाईन हे तेच रसायन आहे जे आपल्याला चांगले वाटेल असे काम वारंवार करण्यास प्रवृत्त करते. या छोट्या-छोट्या आनंदाच्या लाटांनंतर, मेंदू तितक्याच वेगाने खाली येतो. आणि हेच तीव्रतेने खाली येणे थकवा, सुस्ती, मानसिक ताण निर्माण करतो.

बस एक व्हिडीओ आणखी संशोधनात, मुले, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तिन्ही वयोगटांवर याचा परिणाम जवळपास सारखाच आढळला. याचा अर्थ, ही ‘जेन-झी’ची समस्या नसून, ती प्रत्येक वयोगटातील समस्या आहे. सर्वाधिक नुकसान अशा लोकांमध्ये नोंदवले गेले जे स्वतःला प्रत्येक वेळी म्हणतात, ‘बस एक व्हिडीओ आणखी...’ आणि यात कित्येक तास जातात. यात लोक इच्छा असूनही स्क्रोल करणे थांबवू शकत नाहीत. हे धोकादायक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

...तर लगेच ‘ब्रेक’ घ्याअहवालानुसार, जास्त वेळ मोबाइलची स्क्रीन स्क्रोल करत राहणे झोपेची गुणवत्ता, मूड आणि मानसिक स्पष्टता बिघडविते. कमी झोप, चिंता आणि तणाव पुढे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक कमकुवत करतात. तज्ज्ञांनुसार, जर तुम्हाला खालील गोष्टी जाणवत असतील, तर हा तुमच्या मेंदूचा स्पष्ट संकेत आहे की आता थोडी विश्रांती आवश्यक आहे: लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत घट, चिडचिडेपणा, स्क्रोल करणे थांबवण्यात अडचण, झोप अनियमित होणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Reels enslaving your brain! Detrimental to memory and mental health.

Web Summary : Scrolling reels impacts focus, memory, and mental health. Each scroll gives a dopamine kick, followed by a crash leading to fatigue and stress. All age groups are affected, especially those who endlessly scroll. Take breaks if you experience focus issues, irritability, or sleep problems.
टॅग्स :Mobileमोबाइल