शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 07:31 IST

अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील. 

सिद्धार्थनगर : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे पूर्ण झाले असून त्यात भाजपला ३१० पेक्षा अधिक जागा मिळतील तर काँग्रेस ४० जागा जिंकण्याचीही शक्यता नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केला. 

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये इंडिया आघाडीचा धुव्वा उडाला आहे. तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष यावेळी चार लोकसभा जागाही जिंकू शकणार नाही. उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे डुमरियागंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदंबिका पाल यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी सभा घेतली. त्यात ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो परत मिळविल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही. राहुल गांधी मतपेढीचे राजकारण करत आहेत.

‘भारत बलाढ्य अर्थव्यवस्था बनणार’शाह यांनी सांगितले की, लष्करातील निवृत्त लोकांसाठी वन रँक वन पेन्शन ही योजना भाजप सरकारने लागू केली. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनेल.

त्यांच्याकडे उमेदवार नाही- अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील. - अशा पद्धतीने देशाचा कारभार चालविणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी केला. मोदी यांनी गेल्या २३ वर्षांच्या सार्वजनिक कार्यात एकही सुटी घेतली नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी