सोनियांना ‘निवृत्ती’चा सल्ला देणे अनुचित

By Admin | Updated: February 28, 2015 00:51 IST2015-02-28T00:51:37+5:302015-02-28T00:51:37+5:30

सोनिया गांधी यांनी पक्षाला अनुकरणीय नेतृत्व प्रदान केलेले आहे व अशा नाजूक वळणावर पक्षाला आता सामूहिक नेतृत्वाची गरज आहे,

It is inappropriate to advise Sonia for 'retirement' | सोनियांना ‘निवृत्ती’चा सल्ला देणे अनुचित

सोनियांना ‘निवृत्ती’चा सल्ला देणे अनुचित

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांनी पक्षाला अनुकरणीय नेतृत्व प्रदान केलेले आहे व अशा नाजूक वळणावर पक्षाला आता सामूहिक नेतृत्वाची गरज आहे, असे माजी कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी म्हटले आहे. सोनिया यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे, असा सल्ला देणे अनुचित, अप्रिय असल्याचे ते म्हणाले.
तथापि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यान दृष्टिकोनात मात्र मतभेद असू शकतात, असे त्यांनी कबूल केले. ते म्हणाले, सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाला अनुकरणीय नेतृत्व प्रदान केलेले आहे आणि अशा नाजूक वळणावर पक्षाची सामूहिकपणे पुनर्बांधणी करणे आवश्यक असताना राहुल गांधी यांच्या ऊर्जादायक भूमिकेसोबतच सोनिया गांधी यांची भूमिकाही तेवढी महत्त्वाची आहे; पण शेवटी राहुल हेच पक्षाध्यक्षाची भूमिका बजावणार आहेत. काँग्रेसमध्ये काही मुद्यांवरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद पाहायला मिळाले आहेत, असे पक्षाचेच काही नेते सांगत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, असे काहीही नाही. कसलेही मतभेद नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)



 

Web Title: It is inappropriate to advise Sonia for 'retirement'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.