शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

पीडीएफ वृत्तपत्र सोशल मीडियावर प्रसारित करणे बेकायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 04:37 IST

PDF newspaper : अनेक जण सर्रास बेकायदेशीरपणे  सुवाह्य प्रलेख स्वरूपातील (पीडीएफ) वृत्तपत्र डाऊनलोड करतात. तथापि, असे करणे व्हॉटस्‌ॲप ग्रुप्ससारख्या ॲडमिन्स आणि सदस्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते

नवी दिल्ली :  लॉकडाऊनच्या सुरुवातीला दररोज सकाळी वर्तमानपत्राला मुकणारे लोक आवर्जून आपल्या पसंतीच्या वृत्तपत्राची पीडीएफ आवृत्ती वाचायचे. वृत्तपत्रापासून कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि वृत्तपत्रे सुरक्षित आहेत, हे अध्ययानातून स्पष्ट झाल्यानंतरही आजही अनेक जण सर्रास बेकायदेशीरपणे  सुवाह्य प्रलेख स्वरूपातील (पीडीएफ) वृत्तपत्र डाऊनलोड करतात. तथापि, असे करणे व्हॉटस्‌ॲप ग्रुप्ससारख्या ॲडमिन्स आणि सदस्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला असताना हा प्रकार चालू आहे.सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील पवन दुग्गल यांनी म्हटले आहे की, विनापरवानगी वृत्तपत्रांच्या पीडीएफ आवृत्तीच्या सशुल्क सामग्रीचे परिसंचारण कायद्याचे उल्लंघन ठरते. मालकाच्या परवानगीशिवाय वृत्तपत्राच्या डिजिटल आवृत्तीचे परिसंचारण  करणे, मालकीहक्क अधिनियम (कॉपीराईट ॲक्ट) तसेच  माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील (इन्फॉर्मेशन टेक्नॉलाॅजी ॲक्ट) कलम ४३ चे उल्लंघन होय.माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील (इन्फॉर्मेशन टेक्नॉलाॅजी ॲक्ट) कलम ४३ यात स्पष्ट म्हटले आहे की,  एखाद्याने संगणकीत स्रोतातील एखादी माहिती नष्ट करण्याचा किंवा हटविणे किंवा त्याचे मूल्य वा उपयोगिता कमी  करण्याचा प्रयत्न करणे, अवैध आहे. असे करणारी  व्यक्ती तिच्या या कृतीने प्रभावित झालेल्या व्यक्तीला नुकसानभरपाई देण्यास उत्तरदायी आहे. वृत्तपत्र वाचण्याची ही पद्धत जोखमीची आहे. कारण वृत्तपत्रातील साम्रगीशी एखादी व्यक्ती छेडछाड करण्याची शक्यता आहे.  ...तर ग्रुप ॲडमिन दोषीइंडियन न्यूजपेपर सोसायटीनेही (आयएनएस) स्पष्ट केले आहे की, अनधिकृतपणे ई-पेपर किंवा यातील माहिती साम्रगीची नक्कल करून सोशल मीडियावर प्रसारित करणे बेकायदेशीर आहे.  पीडीएफ वृत्तपत्र संपर्क-संदेशात्मक व्यासपीठावर प्रसारित केल्यास ग्रुप ॲडमिन दोषी असेल. अशा लोकांना कठोर कारवाईसोबत जबर दंडही सोसावा लागू शकतो.

टॅग्स :Mediaमाध्यमेSocial Mediaसोशल मीडिया