भीक मागण्यापेक्षा बारमध्ये नृत्य करणे चांगले!
By Admin | Updated: April 26, 2016 06:34 IST2016-04-26T06:34:38+5:302016-04-26T06:34:38+5:30
सर्वोच्च न्यायालयाने काहीही करून डान्सबार सुरू होऊ न देण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

भीक मागण्यापेक्षा बारमध्ये नृत्य करणे चांगले!
नवी दिल्ली : महिलांनी रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा किंवा अन्य काही आक्षेपार्ह कृत्ये करण्यापेक्षा डान्सबारमध्ये नृत्य करणे अधिक चांगले, असे मत व्यक्त करीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने काहीही करून डान्सबार सुरू होऊ न देण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
डान्सबारना १० दिवसांत परवाने द्या, असा आदेश देऊन दीड महिना उलटला तरी अद्याप एकाही डान्सबारला परवाना न दिल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी पुन्हा एकदा धारेवर धरले. न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या अटींचे डान्सबार मालक आणि पोलीस या दोघांनीही पालन करावे, असे सांगून पुढील सुनावणी १० मे रोजी ठेवली.
>मुंबईत डान्सबारसाठी १५४ अर्ज
मुंबईत डान्सबार परवान्यासाठी एकूण १५४ व्यावसायिकांकडून
अर्ज आले होते. त्यापैकी एकही अर्जदार सरकारने नव्या कायद्यानुसार घातलेल्या एकूण २६ अटींची पूर्तता करू शकला नाही. एकाही अर्जदाराने अग्निशमन दल, महापालिकेचा दाखला, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची मंजुरी व बारमधील कर्मचारी गुन्हेगार नसल्याचे पोलिसांचे शहानिशा प्रमाणपत्र देऊ शकलेला नाही.