शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण हा मुद्दा चर्चेत नव्हताच; काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 07:07 IST

काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक : संघटनात्मक विषयावर चर्चा

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या शुक्रवारी येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पक्षातर्फे कोण असेल हा विषय नव्हता. प्रसारमाध्यमांत मात्र या उलट बातम्या होत्या.  या बैठकीला पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस (संघटना प्रभारी) के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

या बैठकीत अध्यक्षपदाचा विषय चर्चेत होता का, असे विचारले असता पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, ‘नाही, त्याची चर्चा झाली नाही. बैठक महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर घेण्यात आली होती.’ राज्यात स्वबळावर लढणार का, यावर पाटील म्हणाले की, तो विषय २०२४ मध्ये समयोचित आहे (२०२४ मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणूक आहे).

राज्यात महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये सत्तेचे वाटप जसे ठरले आहे त्यानुसार अध्यक्षपद काँग्रेसला दिले गेले आहे आणि काँग्रेसचे नाना पटोले हे अध्यक्ष बनले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ते पद सोडले व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तेव्हापासून पक्षाला त्यांच्या वारसावर निर्णय घेता आलेला नाही. याशिवाय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला अध्यक्ष असेल की नाही हेदेखील स्पष्ट नाही. राज्य आणि मुंबई प्रांतीय काँग्रेसचा भर ‘एकला चलो रे’ आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा यावर असताना अखिल भारतीय काँग्रेस समिती त्याला फार महत्त्व देत नाही. 

भाजप निवडणूक जिंकणे अशक्य

‘जर आम्ही (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र राहिलो, तर बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे आणि इतर महानगरपालिकांची आगामी निवडणूक भाजपला जिंकता येणार नाहीत,’  असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. हा नेता म्हणाला की, ‘पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला याची जाणीव आहे.’

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी