महाराष्ट्रातील कुंभमेळ्याच्या निधीचा मुद्दा विचाराधीन

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30

नवी दिल्ली- जुलै २०१५ ते ऑगस्ट २०१६ दरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांकरिता आवश्यक असलेल्या निधीबाबत सरकार विचार करीत असल्याचे संसदेत सांगण्यात आले. नियोजन मंत्री राव इंद्रजितसिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली.

Issue of Kumbh Mela funds in Maharashtra under consideration | महाराष्ट्रातील कुंभमेळ्याच्या निधीचा मुद्दा विचाराधीन

महाराष्ट्रातील कुंभमेळ्याच्या निधीचा मुद्दा विचाराधीन

ी दिल्ली- जुलै २०१५ ते ऑगस्ट २०१६ दरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांकरिता आवश्यक असलेल्या निधीबाबत सरकार विचार करीत असल्याचे संसदेत सांगण्यात आले. नियोजन मंत्री राव इंद्रजितसिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली.
नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या या मेळयाकरिता २,३७८ कोटींच्या निधीची गरज असल्याचे ते म्हणाले. एखाद्या राज्यात भरणारा मेळा हा जरी राज्याचा प्रश्न असला तरी, राज्याने सादर केलेल्या प्रस्तावानुसार त्यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रस्तावात नागरी सुविधांच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या उभारणीचा, विद्युत पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, निवारागृहे आदींचा समावेश आहे.

Web Title: Issue of Kumbh Mela funds in Maharashtra under consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.