मोतीबागेतील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

तातडीने केलेल्या मोजणीत अतिक्रमण झाल्याचे उघड

The issue of the cemetery of Moti Bagh will be started | मोतीबागेतील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार

मोतीबागेतील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार

तडीने केलेल्या मोजणीत अतिक्रमण झाल्याचे उघड
बारामती : बारामती नगरपालिका हद्दीतील मोतीबाग येथील अतिक्रमण केलेल्या जागेची भूमिअभिलेख खात्याच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) मोजणी केली. अतिक्रमणाच्या प्रश्नामुळे येथील वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन तातडीने संबंधित जागेची मोजणी करण्यात आली. यावेळी मोजणी दरम्यान ओढ्याची हद्द निश्चित करण्यात आली. यावेळी अतिक्रमण झाल्याची बाब पुढे आल्याचे प्रशासन अधिकार्‍यांनी सांगितले. येथील दोघां शेतकर्‍यांनी स्मशानभूमीवरच अतिक्रमण केले. एकाने तर राज्य मार्गापर्यंत तारेचे कुंपण घातले आहे. स्वत: अतिक्रमण केलेले असताना तारेचे कुंपणावर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा फलक देखील शेतकर्‍याने लावला आहे. मागील ७- ८ महिन्यांपासून स्मशानभूमीच्या अतिक्रमणाबाबत नगरपालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. बारामती नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यावर या परिसराचा त्यामध्ये समावेश झाला. मात्र, या जागेवर संरक्षक कुंपण घातल्याने दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बारामती-इंदापूर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेऊन मोजणी करण्यात आली. यावेळी भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी सर्व्हे नं. ६८ अ, ब ची मोजणी केली. तसेच, ओढ्याची हद्द निश्चित करण्यासाठी जागेची मोजणी केली. या दरम्यान ५ ते ६ एकर क्षेत्रात अतिक्रमण झाल्याचा अंदाज भूमिअभिलेख अधिकारी अमर पाटील यांनी व्यक्त केला. २४ तासात जलद गतीने ही मोजणी करण्यात आली आहे. यावेळी नायब तहसीलदार विलास करे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. मुख्याधिकारी झिंजाड यांनी सांगितले की, शासनाकडून संबंधित जागा हस्तांतरित करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर या जागेवर स्मशानभूमी बांधण्यात येईल. त्या शेतकर्‍याने स्वत:हून अतिक्रमण काढण्याची कबुली दिली आहे.
———————————————————
जोड आहे

Web Title: The issue of the cemetery of Moti Bagh will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.