मारीया यांच्या नियुक्तीचा वाद मिटला
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:14+5:302014-12-20T22:27:14+5:30
मारिया यांच्या नियुक्तीचा वाद मिटला

मारीया यांच्या नियुक्तीचा वाद मिटला
म रिया यांच्या नियुक्तीचा वाद मिटलायाचिका मागे : नियुक्तीत डावलले नाहीमुंबई - राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी केलेल्या नियुक्तीत काही बेकायदा नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला असून यामुळे ही याचिकाही मागे घेण्यात आली़एका सामाजिक कार्यकत्याने ही याचिका केली होती़ मारिया यांच्यापेक्षा इतर वरिष्ठ अधिकारी या पदाच्या शर्यतीत होते़ मात्र नियम डावलून मारिया यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली़ तेव्हा ही नियुक्ती रद्दबातल ठरवावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती़न्या़ अनुप मोहता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात मारिया यांची नियुक्ती नियमानुसारच केल्याचा दावा सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी केला़ ही नियुक्ती करताना कोणालाही डावलण्यात आले नाही व कायद्याचे उल्लंघन झाले नाही़ मुळात हा जनहितार्थ विषय नसून ही याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने करणे योग्य नाही़ तेव्हा ही याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी ॲड़ वग्यानी यांनी केली़ती ग्रा धरत न्यायालय ही याचिका फेटाळणार होते़ मात्र ही याचिका मागे घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली़ न्यायालयाने ती मान्य केली़