द्विवेदींवरील कारवाईचा मुद्दा खुलाच - काँग्रेस मोदीप्रशंसेमुळे वाद : पक्षनेतृत्व निर्णय घेणार

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:22+5:302015-01-23T23:06:22+5:30

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यानंतर स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा अद्यापही काँग्रेसश्रेष्ठींकडे प्रलंबित आहे.

The issue of action against Dwivedi is uncovered - Congress will argue due to Mr. Modi's dispute: | द्विवेदींवरील कारवाईचा मुद्दा खुलाच - काँग्रेस मोदीप्रशंसेमुळे वाद : पक्षनेतृत्व निर्णय घेणार

द्विवेदींवरील कारवाईचा मुद्दा खुलाच - काँग्रेस मोदीप्रशंसेमुळे वाद : पक्षनेतृत्व निर्णय घेणार

ी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यानंतर स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा अद्यापही काँग्रेसश्रेष्ठींकडे प्रलंबित आहे.
हा मुद्दा अद्याप संपलेला नाही. पक्षनेतृत्व कारवाईबद्दल निर्णय घेणार असून तुम्हाला कळविले जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकारांना सांंगितले.
६९ वर्षीय द्विवेदी यांनी पक्षनेतृत्वाकडे स्पष्टीकरण दिल्यामुळे हे प्रकरण संपलेले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते पी.सी. चाको यांनी गुरुवारी रात्री म्हटले होते. त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता माकन म्हणाले की, चाको यांना त्याबाबत पूर्ण माहिती नाही. हा मुद्दा पक्षनेतृत्वाकडे प्रलंबित आहे. मी बोलत आहे तोच काँग्रेसचा अखेरचा शब्द आहे. माकन हे अ.भा. काँग्रेसच्या दळणवळण समितीचे अध्यक्ष आहेत.(प्रतिनिधी)
------------------------
द्विवेदी ॲन्टनींना भेटले...
मी मोदींची कधीही प्रशंसा केलेली नाही, असा खुलासा द्विवेदी यांनी काँग्रेसच्या शिस्तभंग कारवाई समितीचे अध्यक्ष ए.के. ॲन्टनी यांची भेट घेऊन केला होता. कॉँग्रेसमधील जुने निष्ठावंत आणि नव्या पिढीतील नेत्यांमधील संघर्ष म्हणून द्विवेदींच्या विधानाकडे बघायचे काय? द्विवेदींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली काय? या प्रश्नाची उत्तरे माकन यांनी टाळली. द्विवेदी हे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे खास विश्वासू मानले जात असून त्यांनी मोदींची प्रशंसा केल्यामुळे पक्षांतर्गत टीकेचे मोहोळ उठले होते. माकन हे राहुल गांधी यांच्याशी निकटस्थ मानले जात असून त्यांनी तडकाफडकी पत्रपरिषद बोलावत द्विवेदी यांना फटकारले होते. मी मोदींना कधीही भारतीयत्वाचे प्रतीक संबोधले नव्हते. भारतीयत्व काय आहे? हे कुणी मला शिकवण्याची गरज नाही, असे द्विवेदींनी नंतर स्पष्ट केले होते.

Web Title: The issue of action against Dwivedi is uncovered - Congress will argue due to Mr. Modi's dispute:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.