ISROचं फ्रेंच गुएनातून GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 09:05 AM2019-02-06T09:05:04+5:302019-02-06T09:08:07+5:30

भारताच्या अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून प्रक्षेपित केला आहे.

ISRO's successful launch of GSAT-31 satellite from French Guan | ISROचं फ्रेंच गुएनातून GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISROचं फ्रेंच गुएनातून GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Next
ठळक मुद्देइस्रोनं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून प्रक्षेपित केलाजीसॅट 31चं वजन 2535 किलोग्रॅम आहे. उपग्रहाच्या माध्यमातून भूमी आणि द्वीप समूहांना सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- भारताच्या अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह लाँच केला आहे.  बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. जीसॅट 31चं वजन 2535 किलोग्रॅम आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भूमी आणि द्वीप समूहांना सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

जीसॅट 31 हा देशाचा 40वा संचार उपग्रह आहे. यशस्वी प्रक्षेपणानंतर हा ग्रह 15 वर्षं सेवा देणार आहे. हा टीव्ही अपलिंक, डिजिटल सेटलाइट न्यूज एकत्रीकरण, डीटीएच टीव्हीसारख्या सेवा पुरवणार आहे. हा उपग्रह क्यू बॅन्ड ट्रांसपॉन्डर्सची क्षमता वाढवणार आहे. अवकाश संशोधन संस्थेच्या माहितीनुसार या उपग्रहाचं आयुर्मान 15 वर्षं आहे. अवकाशातल्या कक्षेच्या आतील भागातील इतर उपग्रहांचं संचालन संबंधी सेवांना कार्यान्वित ठेवण्यासाठी हा उपग्रह मदत करणार आहे.

जिओस्टेशनरी कक्षेत केयू बँड ट्रान्सपोंडरची क्षमताही वाढवणार आहे. जीसॅट 31 उपग्रहाला इस्रो परिष्कृत I-2K बेसमध्ये स्थापित करणार आहे. हा उपग्रह इस्रोच्या इनसॅट/जीसॅट उपग्रह श्रेणीच्या उपग्रहांना उन्नत करणार आहेत. उपग्रह भारतीय भू-भाग आणि द्वीप समूहाला सेवा पुरविणार आहे. इस्रोनुसार, उपग्रह व्यापक बँड ट्रान्सपोंडरच्या मदतीनं अरबी समुद्र, बंगालची खाडी आणि हिंद महासागरात संचाराची सुविधा पुरविणार आहे. 

Web Title: ISRO's successful launch of GSAT-31 satellite from French Guan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो