शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'इस्रो'ची दमदार कामगिरी, EMISAT आणि 28 उपग्रहांसह PSLVC45 अवकाशात झेपावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 10:22 IST

PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने आणखी एक नवा विक्रम रचला आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून  28 देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देPSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने आणखी एक नवा विक्रम रचला आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.सोमवारी (1 एप्रिल) 9 वाजून 27 मिनिटांपासून हे उपग्रह अवकाशात झेपावले.

चेन्नई - PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने आणखी एक नवा विक्रम रचला आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. सोमवारी (1 एप्रिल) 9 वाजून 27 मिनिटांपासून हे उपग्रह अवकाशात झेपावले. EMISAT या उपग्रहासोबतच काही परदेशी उपग्रहांचेसुद्धा प्रक्षेपण करण्यात आले आहे. 

PSLVC45 द्वारे उपग्रह प्रक्षेपित करता येतात. तसेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रहही प्रक्षेपित करता येतात. PSLVC45 EMISAT या मुख्य उपग्रहासह एकूण 29 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. यामध्ये अमेरिकेचे 24, भारताचा 1, ल्युनिनियाचे 2, स्वित्झर्लंडचा 1 आणि स्पेनचा 1 अशा उपग्रहांचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. यातील EMISAT  हा उपग्रह भारतासाठी खास आहे कारण या उपग्रहाच्या साहाय्याने भारताला शत्रूच्या रडारची माहिती सहज मिळणार आहे.

पीएसएलव्ही मालिकेतील हे 47 वं मिशन ठरणार आहे. सर्वप्रथम एमिसॅट अंतराळात  749 किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित केलं जाणार आहे. पुढे हे अंतर कमी करत त्याला उर्वरित 28 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी 504 किलोमीटर अंतरापर्यंत उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हे पूर्ण मिशन तीन तास चालणार आहे. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) ‘चांद्रयान-2’ मोहिमेला एप्रिल अखेरचा मुहूर्त भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान 2 या महत्वाकांक्षी मोहिमेला मुहूर्त मिळाला आहे. या मोहिमेतील यानाचे एप्रिल अखेरीस उड्डाण होईल. याबाबतची तयारी सुरू असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली होती. मागील काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे ही मोहिम सातत्याने पुढे ढकलली जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात हे यान उतरविण्याचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान 1 मोहिमेमध्ये चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. चांद्रयान 2 मोहिमे अंतर्गत त्याचा अधिक खोलवर अभ्यास केला जाणार आहे. सिवन म्हणाले, या मोहिमेसाठीची आवश्यक चाचण्या सध्या सुरू आहेत. एप्रिल अखेरीस आम्ही यान सोडण्यासाठी सज्ज असू. चांद्रयान 2 यानाचे वजन जवळपास 3 हजार 290 किलो आहे. यासाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत