शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

इस्रोचा आदित्य L1 पॉईंटच्या दिशेने निघाला, सौर महामार्गावर प्रवास सुरू ; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 16:30 IST

इस्रोचे सूर्य मिशन आदित्य आता L1 पॉईंटकडे सरकले आहे. १८ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता त्यांचे ट्रान्स लॅरेंजियन पॉइंट 1 इन्सर्शन करण्यात आले.

चंद्रयान ३ नंतर इस्त्रोने आदित्य L1 मिशन हाती घेतलं आहे. आदित्य-L1 सन मिशन आता पृथ्वी आणि सूर्यामधील लॅरेंज पॉइंट 1 कडे वळली आहे. म्हणजेच त्याचे Trans Lagrangian Point 1 Insertion झाले आहे. आता आदित्यला फक्त ११० दिवस अंतराळात प्रवास करायचा आहे. यानंतरच ते L1 बिंदूवर पोहोचेल. बेंगळुरूच्या ITRAC, श्रीहरिकोटाच्या SDSC-SHAR आणि पोर्ट ब्लेअरच्या ISRO केंद्रातून याचे परीक्षण करण्यात आले. यापूर्वी आदित्यने त्याच्या बाजूने काही डेटा पाठवला होता. जे त्याच्या STEPS उपकरणाने गोळा केले होते.

Jio AirFiber झाली लाँच! तुम्हाला केबलशिवाय 1Gbps पर्यंत इंटरनेटला स्पीड मिळेल, 14 OTT चे एक्सेस; वाचा संपूर्ण प्लॅन

या उपकरणाने ५० हजार किलोमीटर अंतरावरून सुपरथर्मल-एनर्जेटिक आयन आणि इलेक्ट्रॉन्सचा अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे या कणांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो हे समजण्यास वैज्ञानिकांना मदत होईल. ते अभ्यास करू शकतील.

याआधी आदित्य-L1ने त्याची अपडेट देण्यासाठी सेल्फी पाठवला होता. त्याचे सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत असल्याचे सांगण्यात आले. त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटोही घेतली आहेत. तसेच व्हिडीओ बनवला. आदित्य L1 दररोज १४४० फोटो पाठवेल. सूर्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करता येईल. आदित्यमध्ये जोडलेले दृश्यमान उत्सर्जन लाइन कोरोनाग्राफद्वारे हे फोटो घेतले जातील.

आदित्य-L1 वरून सूर्याचा पहिला फोटो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये उपलब्ध होईल. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. तो सूर्याचा अभ्यास सुरू करेल.

आदित्यसाठी प्लाझ्मा विश्लेषक पॅकेज आहे. हे सूर्याच्या उष्ण वाऱ्यांमध्ये उपस्थित असलेल्या इलेक्ट्रॉन्स आणि जड आयनांच्या आणि दिशांचा अभ्यास करेल. या वाऱ्यांमध्ये किती उष्ण आहे ते कळेल. हे चार्ज केलेल्या कणांचे म्हणजे आयनांचे वजन देखील निर्धारित करेल. सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. ही एक अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप आहे. ते सूर्याची अल्ट्राव्हायोलेट तरंगलांबीचे फोटो घेईल. ते सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरचे फोटोही घेईल.

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3