मंगळ मोहिमेसाठी इस्रोला ‘स्पेस पायोनियर’ पुरस्कार
By Admin | Updated: June 10, 2015 01:15 IST2015-06-10T01:15:01+5:302015-06-10T01:15:01+5:30
सर्वात कमी खर्चात मंगळ मोहीम पार पाडल्याबद्दल जगभरात नावलौकिकाला आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)२०१५ चा ‘स्पेस पायोनियर’ (अंतराळ पथदर्शी) हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.

मंगळ मोहिमेसाठी इस्रोला ‘स्पेस पायोनियर’ पुरस्कार
बंगळुरू : सर्वात कमी खर्चात मंगळ मोहीम पार पाडल्याबद्दल जगभरात नावलौकिकाला आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)२०१५ चा ‘स्पेस पायोनियर’ (अंतराळ पथदर्शी) हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. अमेरिकन राष्ट्रीय अंतराळ सोसायटीने (एनएसएस) हा पुरस्कार बहाल केला आहे. मंगळ मोहिमेचा निर्धारित कालावधी वाढविण्यात इस्रोला यश मिळाल्याची दखलही यानिमित्ताने घेतली गेली आहे.
कॅनडातील टोरोंटो येथे २० ते २४ मे २०१५ दरम्यान झालेल्या ३४ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेत विज्ञान आणि अभियांत्रिकी श्रेणीतील हा पुरस्कार इस्रोला प्रदान करण्यात आला, अशी माहिती इस्रोने आपल्या वेबसाइटवर दिली आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी केल्याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ सोसायटीने या पुरस्काराचा मान इस्रोला दिल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.