शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 17:41 IST

गगनयान मोहिमेत महिलांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य इस्रो चीफ एस सोमनाथ यांनी केले आहे.

ISRO Gaganyaan Mission: अंतराळातील रहस्य उलगडण्यासाठी भारत सातत्याने मोठ-मोठ्या मोहिमा राबवत आहे. आधी चंद्रयान-3 त्यानंतर सूर्य मिशन आणि आता गगनयान मोहिमेची तयारी सुरू आहे. 'इस्रो' मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिमेवर काम करत आहे. काल(दि.21) याची चाचणी उड्डाणदेखील यशस्वी झाले आहे. आता इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी मोठी माहिती दिली आहे.

देशाच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेत महिला फायटर जेट पायलट किंवा वैज्ञानिकांना प्राधान्य  दिले जाईल, आणि त्यांना अंतराळात पाठवले जाईल, असे वक्तव्य सोमनाथ यांनी केले आहे. त्यांनी असेही सांगितले की, इस्रो पुढील वर्षी मानवयुक्त गगनयानमध्ये महिला ह्युमनॉइड (मानवासारखा दिसणारा रोबोट) पाठवेल. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे उद्दिष्ट मानवांना पृथ्वीपासून 400 किमी अंतराळात पाठवून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे आहे.

गगनयान मोहीम 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे अल्पकालीन मिशन असेल. यासाठी, सुरुवातीला हवाई दलातील लढाऊ वैमानिकांकडून चाचणी घेतली जाईल. सध्या आमच्याकडे चाचणीसाठी महिला लढाऊ वैमानिक नाहीत, त्यामुळे भविष्यात महिला वैमानिकांचा शोध घेतला जाईल. दरम्यान, 2035 पर्यंत संपूर्णपणे कार्यरत अंतराळ स्टेशन स्थापन करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3NASAनासाWomenमहिला